पुढारी ऑनलाइन डेस्क : Salman Rushdie : लेखक सलमान रश्दी यांच्यावर ऑगस्टमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे. तर त्यांचा एक हात निकामी झाला आहे. अशी माहिती एजंट वायली याने दिली आहे.
Salman Rushdie : लेखक सलमान रश्दी यांच्यावर एका पुस्तकावर वादग्रस्त लिखाण केल्याबद्दल बंदी घालण्यात आली. 1980 च्या दशकात इराणकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तर त्यांना मारण्यासाठी फतवा जाहीर करण्यात आला होता. नंतर ते कॅनडात स्थायिक झाले. त्यानंतर जवळपास 30 वर्षांनी त्यांच्यावर हा हल्ला झाला. अमेरिकेतील न्यू जर्सी येथील एका कार्यक्रमात हादिमने एकापाठोपाठ चाकूने वार करून रश्दीला जखमी केले होते.
एजंट अँड्र्यू वायलीजने स्पॅनिश वृत्तपत्र एल पेसला दिलेल्या मुलाखतीत रश्दीवर झालेल्या क्रूर हल्ल्यात किती दुखापत झाली याविषयी सविस्तर माहिती दिली. रॉयटर्सने याचे वृत्त दिले आहे.
Salman Rushdie : वायलीजने सांगितले, रश्दीच्या मानेवर तीन गंभीर जखमा होत्या. त्याच्या हातातील नसा कापल्या गेल्यामुळे एक हात अशक्त झाला आहे. त्यामुळे ते आता त्याचा वापर करू शकत नाही. छातीत आणि धडावर आणखी 15 जखमा आहेत.
75 वर्षीय रश्दी यांचे यकृत खराब झाले होते आणि हात आणि डोळ्यातील नसा तुटल्या होत्या. रश्दी रुग्णालयात राहणार की नाही हे सांगू शकत नाही किंवा त्याच्या ठावठिकाणी चर्चा करू शकत नाही. तो जगणार आहे, हीच महत्वाची गोष्ट आहे, असे वायली म्हणाला.
Salman Rushdie : कोणते आहे ते वादग्रस्त पुस्तक?
सलमान रश्दी यांनी लिहिलेल्या द सॅटॅनिक व्हर्सेस इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत अनेक आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले आहे, असे मुस्लिमांचे मत आहे. त्यामुळे अनेक मुस्लिम लोक त्याला निंदनीय मानतात. इराणमध्ये 1988 पासून या पुस्तकावर बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्या अशा प्रकारच्या लिखाणामुळे इराणचे नेते आयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी रश्दीच्या मृत्यूची मागणी करणारा फतवा जारी केला.
दरम्यान, रश्दी यांच्यावर असा क्रूर हल्ला करणा-याला याबाबत कोणताही पश्चाताप नाही. त्याला वेस्टर्न न्यूयॉर्क तुरुंगात जामीनाशिवाय ठेवण्यात आले आहे.
हे ही वाचा :