पुढारी ऑनलाईन डेस्क : सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे आज (दि 14 नोव्हेंबर) दीर्घ आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. (Sahara Group founder Subrata Roy)
सुब्रत रॉय हे सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते. 10 जून 1948 रोजी अररिया, बिहार येथे जन्मलेले रॉय हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक होते. ते वित्तीय, रिअल इस्टेट, मीडिया यासह विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत होते. मुंबईतील कोकिळाबेन धीरूभाई रुग्णालयात आज (दि. १४) रात्री 10:30 वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. त्यांचे पार्थिव उद्या (15 नोव्हेंबर) लखनौमधील सहारा शहरात आणले जाईल जिथे त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यात येईल अशी प्राथमिक माहिती आहे. रॉय यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे.