Rohit Sharma New Record : ‘हिटमॅन रोहित’ ठरला सिक्सर किंग; ‘या’ फलंदाजाला टाकले मागे

Rohit Sharma
Rohit Sharma

पुढारी ऑनलाईन डेस्क : वन-डे विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम रोहित शर्माने आपल्या नावावर केला आहे. त्याने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात या विक्रमाला गवसणी घातली. त्याने विश्वचषक स्पर्धेत ५५४ षटकार लगावत हा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज क्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. ख्रिस गेलने विश्वचषक स्पर्धेत ५५३ षटकार लगावले होते. दरम्यान हिटमॅन रोहित शर्माने क्रिस गेलचा विक्रम मोडित काढला आहे. (Rohit Sharma New Record)

अफगाणिस्तान विरोधात रोहितचे अर्धशतक

विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला भोपळाही न फोडता माघारी जावे लागले होते. दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या आणि विश्वचषकातील भारताच्या दुसऱ्या सामन्यात रोहितने अर्धशतकी खेळी केली आहे. त्याने ४३ चेंडूमध्ये ७६ धावा केल्या असून तो क्रिजवर टिकून आहे.  (Rohit Sharma New Record)

शतकांचा विक्रम नावावर करण्याची संधी  (Rohit Sharma New Record)

हिटमॅन शर्माला आणखी एका विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. विश्वचषकात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. वन-डे विश्वचषकात सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्माच्या नावावर ६ शतके आहेत. अफगाणिस्तान विरोधात शतकी खेळी केल्यास विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर करण्याचा रोहितला संधी आहे.  (Rohit Sharma New Record)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news