Yash : ‘रॉकी भाई’ यश आणतोय ‘केजीएफ’पेक्षा मोठा चित्रपट; ब्रह्मास्त्रच्या दुप्पट बजेट

Yash
Yash

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपरस्टार यशच्या 'केजीएफ २' चित्रपटाच्या भरघोस यशानंतर सध्या त्याच्यापेक्षा मोठ्या बजेटच्या दुसऱ्या चित्रपटाची ऑफर त्याला मिळाली आहे. 'केजीएफ३' मधील रॉकी भाईला कोण ओळखत नाही? आता त्याच्याच आगामी बिग प्रोजेक्टची माहिती समोर येत आहे. तर यशने ( Yash ) साऊथच्या मोठ्या दिग्दर्शकांसोबत मेगा बजेटवाला एक चित्रपट साइन केल्याचे वृत्त समजत आहे.

एका रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, अभिनेता यश ( Yash ) लवकरच साऊथ डायरेक्टर शंकर शनमुगमसोबत आगामी चित्रपटाची घोषणा करणार आहे. याच दरम्यान दोघांच्यामध्ये चित्रपटाची चर्चा होत असून हा चित्रपट हिस्टोरिकल वॉर ड्रामावर आधारित असल्याची माहिती मिळतेय. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषेत रिलीज करण्यात येणार आहे. यासोबत या चित्रपटात मोठ्या स्टार्सचादेखील समावेश असणार आहे.

तसेच निर्माते आणि यश यांनी या मल्टीस्टारर चित्रपटासाठी १००० कोटींचे बजेट निश्चित केले आहे. तर या चित्रपटासाठी करण जोहर ते नेटफ्लिक्ससारखे मोठे बॅनर एकत्रित येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यशच्या मोठ्या प्राजेक्टची माहिती खरी असल्यास हा चित्रपट चित्रपटसृष्टीसाठी खूप खास असणार आहे. कारण या चित्रपटाचे 'ब्रह्मास्त्रा' पेक्षा दुप्पट बजेट आहे.

हा चित्रपट ऐतिहासिक असल्याने बनण्यास बराच कालावधी लागणार आहे. तसेच चित्रपटाचे शूटिंग येत्या ४ वर्षांत पूर्ण होवून २०२७ पर्यंत रिलीज होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु, या चित्रपटाची अद्याप निर्मात्यांनी घोषणा केलेली नाही.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news