चंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभरापासून संततधार मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील नदी नाले तलाव मध्यम प्रकल्प तुडूंब भरले आहेत. पाच दिवसांपूर्वी मंगळवारी (18 जुलै) चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पाण्याचा विसर्ग प्रचंड प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे वर्धा नदीला पूर येऊन गोंडपिपरी, चंद्रपूर, कोरपना गडचांदूर तालुक्यातील नदी काठावरील गावांना याचा फटका बसला. पाऊस कमी अधीक प्रमाणात सुरूच असल्याने शेतीही प्रभावीत झाली आहे. काल हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. परंतु आज शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा फारसा जोर पहायला मिळाला नाही. कुठे रिपरिप तर कुळे चांगल्या सरी कोसळल्या. परंतु चंद्रपूर जिल्ह्याला लागूनअसलेल्या यवतमाळ जिल्ह्यातला पावसाने झोडपून काढीत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांना धोक्याची घंटा आहे. यवतमाळ जिल्ह्यातून पैनगंगा नदी वाहत आली आहे.