सपाचे आमदार रईस शेख यांचा राजीनामा

सपाचे आमदार रईस शेख यांचा राजीनामा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच समाजवादी पक्षाचे भिंवडीतील आमदार रईस शेख यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून शनिवारी आमदारकीचा राजीनामा दिला.

रईस शेख यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला. शेख यांचा राजीनामा हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला असून ते सत्ताधारी पक्षात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पक्षाची संघटनात्मक ताकद आणि विस्तार वाढवण्याची माझी बांधिलकी कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शेख म्हणाले, समाजवादी पक्षाचा राज्यात विस्तार करण्यासंदर्भात माझी काही भूमिका आहे. गेले वर्षभर मी त्यासंदर्भातील मुद्दे राज्य नेतृत्वाकडे मांडत आहे. मात्र, त्यावर पक्षाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.
रईस शेख यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली असून पक्षाने त्यांचा राजीनामा मंजूर केल्यास रास्ता रोको करण्यात येईल, असा इशाराही समर्थकांकडून देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news