पुढारी ऑनलाईन – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपले पतधोरण जाहीर केले असून व्याजदरात 25 बेसिक पॉइंटने वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्याने कर्ज आणखी महाग होणार आहे. सोमवारपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची बैठक सुरू झाली आहे. तेव्हापासून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि कंपनीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. आज सकाळी 10 वाजता दास यांनी रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर केले.
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी घोषणा केली की RBI ने रेपो दर 25 बेसिस पॉईंट्सने 6.5% पर्यंत वाढवला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, व्याजदरात 35 बेसिक पॉइंट वाढवण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली तेव्हा एका सदस्याने 35 बेसिस-पॉइंट वाढीला विरोध केला. त्यानंतर तज्ज्ञांनी 25 बेसिक पॉइंटने रेपो रेटने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता. महागाईचा दर गेल्या काही दिवसांत कमी आलेला आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पतधोरणात व्याजदरात २५ बेसिक पॉइंट किंवा ०.२५ टक्के इतकी वाढ करू शकेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यापूर्वी ५ वेळा व्याजदरात मोठी वाढ केलेली आहे.
गेल्या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात सातत्याने वाढ केलेली आहे. गेल्या वर्षांतील ५ वेळाची वाढ लक्षात घेतली तर एकूण वाढ २.२५ टक्के किंवा २२५ बेसिक पॉईंटची आहे. रेपो दरात वाढ झाल्याने कर्जांवरील व्याज आणि जोडीनेच ठेवींवरील व्याजही वाढलेले आहेत. रिझर्व्ह बँकने रेपो दरात वाढ केली तर कर्ज आणखी महाग होणार आहेत.