अजमेर; पुढारी ऑनलाईन : राजस्थानमधील डीएसपीचे अश्लिल व्हिडिओ प्रकरण देशभर गाजत आहे. जलतरण तलावात महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील कृत्य करत असतानाचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी अजमेरमध्ये लपून बसलेला पोलिस अधिकारी हिरालाल सैनीला पोलिसांनी अटक केली आहे. हिरालाल महिला कॉन्स्टेबलसोबत उदयपूरच्या एका रिसोर्टमध्ये लपून बसला होता. (Rajsthan Viral Video Case) कालच पोलिसांनी त्याच्या कृत्याबद्दल निलंबित केले आहे.
याचबरोबर त्या पोलिस अधिकाऱ्यासोबत असलेल्या महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर ही कारवाई अश्लिल व्हिडिओ प्रकरणी कारवाई केली आहे.
दोघांना निलंबित केल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांना रात्री अटक केल्यानंतर राजस्थान पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली आहे. (Rajsthan Viral Video Case)
पोलिस अधिकारी मोहनलाल लाठर यांच्या माहितीनुसार, राजस्थानमधील पोलिसांकडून जे काही कृत्य करण्यात आले ते अतिशय घृणास्पद आहे. यावर जेवढी कठोर शिक्षा देता येईल याची आम्ही खबरदारी घेत आहे. दरम्यान राजस्थान सरकारला याबाबत खडानखडा माहिती देण्यात येणार असल्याचे लाठर म्हणाले.
दरम्यान, चौकशी सुरू आहे. याबाबत संध्याकाळपर्यंत अधिक माहिती येणार असल्याचे लाठर यांनी सांगितले.
निलंबित डीएसपी हिरालाल सैनी जयपूर कमिश्नर आणि महिला कॉन्स्टेबल हे जयपूरमध्ये एकत्र काम करत असताना संपर्कात आले.
राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील बेवार येथील डीएसपी हीरालाल सैनी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जलतरण तलावात महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील कृत्य करत असतानाचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावेळी तेथे एक लहान मुलही होते. याबाबत महिला कॉन्स्टेबलच्या पतीने तक्रार दाखल केली आहे. डीएसपी हीरालाल सैनी यांनी संपूर्ण प्रकरणाला त्यांच्या विरोधातील षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.
२०१८ पासून, हिरालाल सैनी ब्यावर येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून तैनात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली होती, परंतु त्यांनी त्यांची बदली रद्द केली. आता ते या वादात अडकले आहेत. जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा डीएसपी हिरालाल सैनी म्हणाले की, हा त्यांच्याविरुद्धचा कट आहे. व्हिडिओ एडिट केला आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीजीपी एमएल लाठर यांनी ८ सप्टेंबर रोजी आदेश जारी करून हिरालाल सैनी यांना निलंबित केले. आता त्यांना अटक करण्यात आली आहे. डीएसपीविरोधात विभागीय चौकशी आधीच सुरू आहे. स्पेशल ऑपरेशन ग्रुप एडीजी अशोक राठोड यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास एसओजी मुख्यालयातून केला जात आहे. हा व्हिडिओ कोणी बनवला, कोणी व्हायरल केला याचा शोध घेण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.