पुणे : तब्बल दोन वर्षांनंतर राजीव गांधी प्राणी संग्रहालय खुले

पुणे : तब्बल दोन वर्षांनंतर राजीव गांधी प्राणी संग्रहालय खुले
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरोनामुळे गेले दोन वर्षे बंद असलेले राजीव गांधी प्राणीसंग्रहालय आज (रविवार) सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी खुले झाले. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी 8 वाजल्‍यापासून पर्यटकांनी तिकिटासाठी रांगा लावल्या होत्या.

कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय दोन वर्षानंतर पर्यटकांसाठी खुले झाले. याचा पर्यटकांनाही मोठा आनंद झाला असल्याचे पर्यटकांशी बोलताना पहायला मिळाले. तर प्राणी संग्रहालय प्रशासनाच्यावतीने पर्यटकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्राणिसंग्रहालयाच्या अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांनी देखील यावेळी पर्यटकांचे स्वागत केले. यावेळी राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी सुचित्रा सूर्यवंशी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

दोन वर्षानंतर राजीव गांधी प्राणी संग्रहालय आज पर्यटकांसाठी खुले झाले आहे. पर्यटकांना राज्य प्राणी शेकरू जंगल कॅट, लेपरड कॅट हे नवे प्राणी पाहायला मिळणार आहेत. पर्यटकांना प्रवेश करण्यापूर्वी कोरोना लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे, तरच प्राणिसंग्रहालयात प्रवेश देण्यात येणार आहे.

– सुचित्रा सूर्यवंशी, पशुवैद्यकीय अधिकारी, राजीव गांधी प्राणीसंग्रहालय

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news