पुढारी ऑनलाईन डेस्क : जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठीच्या त्यांच्या या उपोषणाने संपूर्ण महाराष्ट्रभर जोर धरला आहे. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांना मोहीम फत्ते होईपर्यंत झुंजत राहू, असे आवाहन करत जरांगे पाटील यांना समर्थन दिले.
मनसेच्या अधिकृत 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आज एक पोस्ट केली. या पोस्टमधून जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत मराठा आऱक्षणासाठी शेवटपर्यंत लढू असे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच या खचून न जाता आणि राजकारणापढे एकही योद्धा खर्ची पडला नाही पाहीजे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
मनसेकडून एक्स या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, गड्यांनो महाराजांची आण हाय तुम्हास्नी… मोहीम फत्ते होईस्तर झुजत राहू या… पर ह्या निबऱ्या पुढाऱ्यांपुढं आपल्या महाराष्ट्राचा ल्योक खर्ची पडता कामा नये! अशा मजकुराची पोस्ट मनसेने एक्स या सोशल मीडियावर केली आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केलेला आहे. यामध्ये ते आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिसून येत आहेत.
हेही वाचा