Punjab election result Live Updates : पंजाबमध्‍ये आप ८८ जागांवर आघाडीवर, दिग्‍गज नेते पिछाडीवर

Punjab election result Live Updates : पंजाबमध्‍ये आप ८८ जागांवर आघाडीवर, दिग्‍गज नेते पिछाडीवर

चंदीगड ; पुढारी ऑनलाईन : पंजाबमध्‍ये तब्‍बल  ८८ जागांवर आम आदमी पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे. (Punjab election result Live Updates) मतमोजणीच्‍या प्रारंभी पंजाबमध्‍ये दिग्‍गज नेते आघाडीवर होते. मात्र काही तासांमध्‍ये चित्र बदलले. मुख्‍यमंत्री चरणजीत चन्‍नी हे भदौड आणि चमकौर साहिब या दोन्‍ही मतदारसंघात पिछाडीवर आहेत. तर अमृतसर पूर्वमधून नवज्‍योत सिंग सिद्धू, काँग्रेसचे बंडखोर नेते अमरिंदर सिंग हे पिछाडीवर पडले आहेत.

८८ जागांवर आम आदमी पार्टी आघाडीवर आहे. काँग्रेस १३, अकाली दल १० तर भाजप ५ जागांवर आघाडीवर आहे.अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीच्‍या जीवन ज्‍योत कौर या आघाडीवर आहेत. येथे काँग्रेसचे नवज्‍योत सिंग सिद्धू आणि शिरोमणी अकाली दलाचे बिक्रम मजीठिया पिछाडीवर आहेत.

एक्झिट पोलच्या सर्वेक्षणानुसार, आम आदमी पार्टी (आप) पंजाबमध्ये विधानसभेच्या ११७ जागांवर बहुमत मिळवू शकते. त्यांना जवळपास ७० जागा मिळू शकतात. सध्या सत्ताधारी काँग्रेसला केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागू शकते. भाजपची सर्वात वाईट कामगिरी पंजाबमध्येच होण्याची शक्यता आहे. भाजप कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेससोबत युती करून निवडणूक लढवत आहे, तर अकाली दल आणि बसपा यांची युती आहे.

Punjab election result Live Updates : पंजाबची 'आप' बल्ले बल्ले करणार ?

पंजाबमध्‍ये आम आदमी पार्टीने जाेरदार मुसंडी मारली आहे. २०१७  मध्‍ये आम आदमी पार्टी विजय हाेईल अशी हवा हाेती. मात्र काँग्रेसने ७७ जागांवर विजय मिळवला होता. आम आदमी पार्टीने २० जागांवर समाधान मानावे लागले हाेते. मात्र यंदाच्‍या निवडणुकीत पंजाबमध्‍ये आम आदमी पार्टीने जाेरदार मुसंडी मारली आहे. तब्‍बल ५५जागांवर आघाडी घेतली आहे.

मतमोजणी पाहता पंजाबमधील सर्व जिल्ह्यांमध्ये कलम १४४ अंतर्गत मनाई आदेश लागू करण्यात आले असून मतमोजणी केंद्राबाहेर लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली असून, विजयी उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी केवळ दोन व्यक्तींसह मतमोजणी केंद्रावर दाखले घेण्यासाठी जाऊ शकतात. विजयी मिरवणुकांवरही बंदी घालण्यात आली आहे.

राज्यातील ६६ ठिकाणी उभारण्यात आलेल्या ११७ मतमोजणी केंद्रांवर सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या ४५ कंपन्या तैनात करण्यात आल्या असून सुमारे ७५०० अधिकारी मतमोजणी प्रक्रियेत गुंतले आहेत, असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news