सातारा पोलिसांना मारहाण केल्याने ‘जर्मनी’च्या दोघांना शिक्षा

सातारा पोलिसांना मारहाण केल्याने ‘जर्मनी’च्या दोघांना शिक्षा
सातारा पोलिसांना मारहाण केल्याने ‘जर्मनी’च्या दोघांना शिक्षा

सातारा; पुढारी वृत्तसेवा : मूळचे जर्मनी देशाचे असलेल्या, पण सातारा जिल्हा कारागृहात (जेल) राडा करून पोलिसांना मारहाण करणार्‍या दोघांना 2 रे तदर्थ न्यायाधीश एन. एच. जाधव यांनी 1 वर्षाची शिक्षा ठोठावली. वाई येथील अंमली पदार्थाबाबत (एनडीपीएस) संशयितांवर मूळ कारवाई करण्यात आली होती.

सेवेस्टीयन स्टेन मुलर (वय 25) व सर्गीस व्हिक्टर मनका (वय 31, दोघे मूळ रा. जर्मन देश) अशी शिक्षा लागलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, दोन्ही आरोपींना वाईमधील अंमली पदार्थावरील कारवाईप्रकरणी अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. दोघांना जेलमध्ये आणल्यानंतर त्यांची तपासणी करत असताना त्यांनी जेल पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केली. जेल पोलिसाला मारहाण झाल्याने कारागृहात खळबळ उडाली.

याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर शासकीय कामात अडथळा व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास फौजदार ए. यू. मुजावर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोन्ही पक्षाच्यावतीने युक्तिवाद झाला असता सरकार पक्षाचे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. महेेश कुलकर्णी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक फौजदार अविनाश पवार व अजित फरांदे यांनी सहकार्य केले. दरम्यान, दोन्ही संशयित आरोपी सध्या कळंबा कारागृहात एनडीपीएस गुन्ह्यात आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news