Maharashtra Kesari: फुलगाव येथे रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा; मंगळवारपासून थरार

Maharashtra Kesari: फुलगाव येथे रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा; मंगळवारपासून थरार
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ आणि सोमेश्वर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 66 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद गादी, माती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा येथे होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप कंद, संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस योगेश दोडके आणि विलास कथुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Maharashtra Kesari)

ही स्पर्धा दि. 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी (दि. 7) सायंकाळी 5 वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष व खासदार रामदास तडस आणि उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे कंद यांनी सांगितले. (Maharashtra Kesari)

स्पर्धेत 36 जिल्हा व 6 महानगर पालिका असे एकूण 42 संघ सहभागी होत आहेत. एका कुस्ती संघात गादी विभागातील 10 व माती विभागातील 10 असे एकूण 20 कुस्तीगीर 2 कुस्ती मार्गदर्शक व 1 संघ व्यवस्थापक असे एकूण 23 जणांचा सहभाग असेल. साधारण या कुस्ती स्पर्धेत 840 कुस्तीगीर 84 कुस्ती मार्गदर्शक व 42 व्यवस्थापक, 80 पंच व 50 पदाधिकारी असे एकूण 1100 जणांचा सहभाग असेल. स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी विजेत्याला थार गाडी तर उपविजेत्याला ट्रॅक्टर देण्यात येणार आहे. प्रत्येक वजन गटातील प्रथम क्रमांक मिळविलेल्या कुस्तीगीर स्प्लेंडर दुचाकी, व्दितीय कमांकास रोख 20 हजार रोख व तृतीय कमांकास रोख 10 हजार रोख बक्षीस म्हणून देण्यात येतील. या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत शासनाच्या वतीने प्रथम क्रमांकास 60 हजार, व्दितीय कमांकास 55 हजार व तृतीय क्रमांकास 50 हजार रूपयांचे मानधन दरवर्षी प्रमाणे देण्यात येणार आहे, असे भोंडवे यांनी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news