आईला औषधांचा ओव्हर डोस देऊन तोंडाला प्लास्टिकची पिशवी गुंडाळत केला खून ; नंतर मुलाची आत्महत्या

file photo
file photo
Published on
Updated on

पुणे ; पुढारी वृत्तसेवा

अभियंता मुलाने बेरोजगारी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आईला औषधांचा ओव्हरडोस देऊन, तोंडाला प्लास्टिकची पिशवी गुंडाळली. त्यानंतर दोरीने गळा दाबून खून केला. यानंतर स्वतःदेखील संबंधित व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्‍कादायक घटना पुण्यातील धनकवडी परिसरात घडली आहे.

निर्मला मनोहर फरताडे, (वय ७६) असे खून झालेल्या महिले नाव आहे. तर गणेश मनोहर फरताडे, (वय. ४२ रा. दोघेही धनकवडी ) याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी गणेश फडतरे याच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा सहकारनगर पोलिसांनी दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (दि. 1) अक्षय गार्डन सोसायटी धनकवडी येथे उघडकीस आली आहे. याबाबत शोनीत तानाजी सावंत यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार फिर्यादीचा गणेश फरताडे याने बेरोजगारीला व कर्जबाजारी पणाला कंटाळुन नैराश्यामधुन त्याची आई निर्मला फरताडे यांना औषधांचा ओव्हर डोस दिला. त्यानंतर चेह-यावर प्लॅस्टीकची पिशवी गुंडाळून दोरीने गळा आवळला. त्यामध्ये निर्मला यांचा मृत्यू झाला. यानंतर स्वतः देखील राहत्‍या घराच्या छताच्या लोखंडी हुकाला नायलॉनची दोरी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सहकारनगर पोलिस करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news