प्रोस्टेट कर्करोगापासून दूर राहण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या

प्रोस्टेट कर्करोगापासून दूर राहण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या
Published on
Updated on

प्रोस्टेट कॅन्सर हळूहळू विकसित होतो. विशेषत: त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत. लक्षणे दिसून येतात, तोपर्यंत कॅन्सर अधिक गंभीर टप्प्यावर पोहोचलेला असण्याची शक्यता असते.

प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो, परंतु वेळीच निदान झाल्याने त्यावर यशस्वी उपचार करता येतात. नियमित तपासणी तसेच प्रोस्टेट कॅन्सरविषयी डॉक्टरांशी मोकळेपणाने संवाद साधणे गरजेचे आहे. वयाच्या पन्नाशीनंतर सर्वच पुरुषांनी प्रोस्टेट कॅन्सरची तपासणी केली पाहिजे. ज्यांना प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता अधिक असते, जसे की कौटुंबीक इतिहास किंवा बीआरसीए (इठउअ) सारखी अनुवंशिक पूर्वस्थिती असल्यास 40 ते45 वयोगटाच्या दरम्यान तपासणीस सुरुवात केली पाहिजे. तपासणीमध्ये प्रोस्टेट-विशिष्ट अँटीजनसाठी रक्त तपासणी (पीएसए चाचणी) करणे गरजेचे आहे.

प्रोस्टेट कर्करोगाच्या लक्षणांमध्ये लघवी किंवा वीर्यामध्ये रक्त दिसून येणे, लघवीच्या समस्या जसे की वारंवार लघवी होणे किंवा कमी प्रमाणात लघवी होणे, मूत्रमार्गात अडथळा, मूत्राशय किंवा आतड्यांच्या हालचालींवरील नियंत्रण गमावणे, नितंबांसारख्या भागात वेदना, पाय कमजोर होणे किंवा सुन्न पडणे, थकवा येणे आणि अनपेक्षितपणे वजन कमी होणे ही लक्षणे दिसतात. प्रोस्टेट कॅन्सर अनेकदा हाडांवरही दुष्परिणाम करतो. ज्यामुळे वेदना होणे, फ्रॅक्चर आणि हालचाल मंदावणे यासारखी लक्षणे दिसून येतात. आपल्याला यापैकी कोणतीही लक्षणे दिसून आल्यास, आपल्या डॉक्टरांकडून त्वरित वैद्यकीय मदत घ्या. बर्‍याचदा प्रोस्टेट किंवा मूत्रसंस्थेशी संबंधित अनेक लक्षणे प्रोस्टेट कॅन्सरमध्ये दिसून येत नाही आणि त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केल जाते. रेडिएशन थेरपी, प्रोस्टेटेक्टॉमी आणि हार्मोन थेरपी यासारख्या पारंपरिक पद्धती आता टार्गेटेड उपचारांसह जोडल्या जातात.

प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे प्रसाराद्वारे लक्ष्यित केलेल्या स्थानानुसार बदलू शकतात. पण पायात पसरलेल्या ट्यूमरचे एक चिन्ह दिसू शकते, जे म्हणजे सूज. सूज यामुळे येते कारण प्रोस्टेट कॅन्सर लिम्फ नॉड्समध्ये पसरतो. त्या भागात द्रव साठल्यामुळे पायांमध्ये सूज येऊ शकते. या सूजला लिम्फोएडेमा म्हणतात.

प्रोस्टेट कर्करोगापासून दूर राहण्यासाठी टिप्स

निरोगी जीवनशैली अंगीकारल्याने प्रोस्टेट कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. आठवड्यातून पाच दिवस 30 मिनिटे मध्यम कसरत करून, तुम्ही तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीचे आरोग्य वाढवता आणि प्रोस्टेटच्या समस्या दूर ठेवता. या प्रकारच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी आपल्या चांगल्या जीवनशैलीबरोबच संतुलित आहाराचे सेवन करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच वजन नियंत्रित राखण्याचा प्रयत्न करणे आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news