pro kabaddi : बंगाल वॉरियर्सचा जयपूरवर विजय

pro kabaddi : बंगाल वॉरियर्सचा जयपूरवर विजय
Published on
Updated on

बंगळूर ; वृत्तसंस्था : प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील सोमवारचा पहिला सामना बंगाल वॉरियर्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स यांच्यात झाला. ही लढत बंगाल वॉरियर्सने जयपूर पिंक पँथर्सचा 31-28 असा पराभव करत जिंकली. बंगाल वॉरियर्सला तीन सामन्यांमधील पराभवानंतर हा विजय मिळाला आहे. (pro kabaddi)

शेवटच्या 30 सेकंदांपर्यंत बंगालकडे केवळ एका गुणाची आघाडी होती. जयपूरची रेड होती आणि अर्जुन देसवालला 2 गुण घ्यायचे होते.

परंतु; नंतर नबी बक्षने आपली चपळता दाखवत संघाच्या खात्यात 2 गुण जमा केले आणि बंगाल वॉरियर्सला सलग 3 पराभवांनंतर अखेर विजय मिळाला.

बंगाल वॉरियर्सचा सहा सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे, तर जयपूर पिंक पँथर्सचा पाच सामन्यांमधला तिसरा पराभव आहे.

pro kabaddi : पाटणा पायरेट्स शेवटच्या क्षणी विजयी

दिवसातील दुसर्‍या रोमांचक सामन्यात पाटणा पायरेट्सने तेलगू टायटन्सचा एका गुणाने पराभव केला. पाटणा संघाने हा सामना 31-30 असा जिंकला. शेवटच्या चढाईत पाटणाचा संघ जिंकला. संदीप कंडोलाची एक चूक तेलगू टायटन्सला चांगलीच महागात पडली. पाटणाचा हा सलग तिसरा विजय आहे.

आजचे सामने
हरियाणा स्टीलर्स विरुद्ध यू मुंबा (संध्या. 7.30 वा.)

यूपी योद्धा विरुद्ध तमीळ थलयवाज (संध्या. 8.30 वा.)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news