Priyanka Chopra : प्रियांका चोप्राचा अविश्वसनीय अनुभव

Priyanka Chopra
Priyanka Chopra
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही अभिनयाबरोबरच नेहमीच सिंगिंगमध्येही नशीब आजमवण्याचा प्रयत्न करत असते. आपले सिंगिंगमधील करिअर पुढे का जाऊ शकले नाही? याबद्दल नुकतीच ती म्हणाली, माझा पती निक जोनस एक रॉकस्टार आहे. मी केवळ अभिनय करण्यासाठी जन्माला आले आहे, गायकी करणे हे बहुधा माझे कामच नाही.

हॅप्पीनेस टूर दरम्यान निक आणि त्याच्या भावांना एकत्र एकाच मंचावर पाहणे एक अविश्वसनीय अनुभव होता. संगीतकारांचे आयुष्य किती बिझी असते याची मला प्रचिती आली. मी पहिल्यांदाच त्यांच्याबरोबर हॅप्पीनेस बिगिन्स टूरवर गेले होते आणि माझ्यासाठी खूपच गंमतीशीर होते. निक आणि त्याच्या भावांना गाताना लाईव्ह पाहणे खूपच कौतुकास्पद असते. गायकांचे आयुष्य खूपच व्यस्त असते, हे मी करू शकत नाही त्यामुळेच माझे सिंगिंग करिअर फार काळ चालले नाही. निक आणि माझे करिअर वेगळे असले तरी आम्ही दोघे एकमेकांना प्रेरित करत असतो. असेही ती म्हणते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news