Preity Zinta : प्रीतीने घेतले कामाख्या देवीचे दर्शन (video)

Preity Zinta
Preity Zinta
Published on
Updated on

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने ( Preity Zinta ) शनिवारी गुवाहाटीला जाऊन प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेतले. याबाबत तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपला अनुभव तिने व्हिडिओत मांडला आहे.

Preity Zinta ने म्हटले आहे की, 'या मंदिरात आल्यानंतर माझ्या मनाला शांतता आणि सकरात्मक विचार करायची शक्ती मिळाली. तुम्ही गुवाहाटीला गेल्यानंतर कामाख्या देवीचे दर्शन नक्की ध्या. 'जय माँ कामाख्या- जय माता दी.' प्रीतीची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती बॉलीवूडपासून दूर आहे, पण प्रीती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात असते.

Preity Zinta
Preity Zinta

सोशल मीडियावर प्रितीचे असंख्य चाहते आहेत. प्रीती कायम तिच्या खासगी आयुष्यातील महत्वाच्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करते. त्याच पद्धतीने तिने गुवाहाटीतील कामाख्या मंदिरातील व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये तिने मंदिराच्या भोवतालचा परिसर देखील दाखवला आहे. व्हिडीओमध्ये प्रीती गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news