पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२३ चा १६ वा हंगाम सध्या खेळला जात आहे. आजवर आयपीएलच्या प्रत्येक हंगामात आश्चर्यचकीत करणाऱ्या, कायम लक्षात रहाणाऱ्या गोष्टी घडल्या आहेत. या लीगमध्ये जगभरातील अव्वल क्रिकेटपटू भाग घेतात. आयपीएल २०२३ च्या दरम्यान पंजाब किंग्जची मालकीण प्रिती झिंटाने एक अतिशय मनोरंजक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की एकदा त्याने आपल्या किंग्ज इलेव्हन पंजाब या संघातील खेळाडूंसाठी १२० पराठे बनवले होते.
ही आयपीएल २००९ ची गोष्ट आहे. जेव्हा पंजाब किंग्जचा संघ किंग्ज इलेव्हन पंजाब म्हणून ओळखला जात होता. पंजाबच्या खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेत चांगले पराठे मिळाले नाहीत. प्रिती झिंटाने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना याचा खुलासा केला. प्रिती झिंटाला शोमध्ये विचारण्यात आले होते, "प्रीती झिंटा तिच्या टीमसाठी आलू पराठे बनवेल असे कोणाला वाटले? मला वाटते यानंतर त्याने बटाट्याचे पराठे खाणे बंद केले असावे, असे प्रिती झिंटा म्हणाली आहे.
पंजाब किंग्जची मालकीण प्रिती झिंटा म्हणाली, "खेळाडू किती खातात हे मला पहिल्यांदाच समजले. आम्ही दक्षिण आफ्रिकेत होतो. आम्हाला चांगले पराठे मिळाले नाहीत. मग मी स्वयंपाक करणाऱ्या कुकला म्हणाले, 'मी तुम्हा सर्वांना पराठे बनवायला शिकवेन.' हे पाहून खेळाडूंनी मला त्यांच्यासाठी पराठे बनवायला सांगितले."
प्रिती झिंटा पुढे म्हणाली, "मी खेळाडूंना सांगितले की, पुढचा सामना जिंकला तरच मी त्यांच्यासाठी पराठे बनवीन. पुढचा सामना त्याने जिंकला. यानंतर मी १२० बटाट्याचे पराठे केले. त्यानंतर मी बटाट्याचे पराठे बनवणे बंद केले. यावेळी हरभजन सिंग आणि इरफान पठाण देखील उपस्थित होते. सर्व ऐकल्यानंतर हरभजन सिंग गंमतीने म्हणाला, इरफान एकटा २० खातो.
पंजाब किंग्सने या मोसमात आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी 4 जिंकले आहेत आणि 4 सामने गमावले आहेत. या चार विजयांसह 8 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे.