पुणे-मुंबईत पाॅझिटिव्ह रेट वाढत आहे ; राजेश टोपेंनी दिला इशारा

पुणे-मुंबईत पाॅझिटिव्ह रेट वाढत आहे ; राजेश टोपेंनी दिला इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क

"रुग्णालयात १४ टक्के रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहात. राज्यात ४६ हजार कोरोनाबाधित आहेत. मृत्यू दराचं प्रमाण कमी होताना दिसतो. पण, कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय, असं समजू नका. या महिन्यात मृत्यू दर ०.३ टक्के आहे. ८६ टक्के रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. मुंबई, पुण्यात पाॅझिटिव्ह रेट वाढत आहे" अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली.

राजेश टोपे यांनी पुढे सांगितले की, "कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनची मागणी वाढत आहे. त्यामुळे केंद्राकडे लसींची मागणी राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोविशिल्ड ६० लाख आणि कोवॅक्सिन ४० लाख लसींची मागणी करण्यात येणार आहे. राज्यात सध्या ९० टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे आणि ६२ टक्के लोकांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतलेला आहे", अशीही माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

"कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेऊ. आणखी १५-२० दिवस तरी शाळा बंद राहतील. राज्यात फेब्रुवारीपर्यंत निर्बंध उठविण्याची शक्यता नाही. लसीकरण घटत आहे, ही चिंताजनक बाब आहे", अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषेदेत दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news