PM Modi in B 20 Summit : ‘वर्षातील एक दिवस आंतरराष्ट्रीय ग्राहक काळजी दिन म्हणून पाळला जावा’; B20 मध्ये PM मोदींनी सुचवले

PM Modi in B 20 Summit
PM Modi in B 20 Summit
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : PM Modi in B 20 Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज B20 परिषदेला संबोधित केले. दिल्ली येथे ही परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, उद्योगांनी सेल्फ सेंट्रीक गोष्टीतून बाहेर पडायला हवे. ग्राहकांच्या गरजांचा विचार करून ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवायला हवे. सर्व उद्योजकांनी असा दिवस तयार करावा जो ग्राहकांना समर्पित असेल. आपण ग्राहक अधिकार दिन साजरा करतो या ऐवजी वर्षातील एक दिवस 'आंतरराष्ट्रीय ग्राहक काळजी दिन' म्हणजेच ग्राहकांची काळजी घेणार दिवस म्हणून पाळला जावा. यामुळे ग्राहक आणि उद्योजक यांमधील परस्पर विश्वास वाढेल, असे मोदींनी यावेळी सूचवले.

या परिषदेत मोदी यांनी विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधले. ते B 20 बाबत म्हणाले की, हे व्यासपीठ व्यावसायिक जगतात काम करणार्‍या अनेक भागधारकांना एकत्र आणत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, G20 गटांपैकी B20 हा सर्वात महत्त्वाच्या एक गट आहे. आर्थिक विकासाला चालना देण्यावर याचे स्पष्ट लक्ष आहे.

PM Modi in B 20 Summit : नवीन मध्यम वर्गाकडे लक्ष द्यावे

भारताने अशी धोरणे लागू केली ज्यामुळे गेल्या 5 वर्षात 13.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. हा नवीन उदयास आलेला मध्यम वर्ग आहे. या वर्गाकडे अनेक नवीन कल्पना आहेत. उद्योगांनी या नवीन वर्गाकडे लक्ष द्यायला हवे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवले आहे.

B-20 बिझनेस समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "भारतात तरुणांची सर्वात मोठी प्रतिभा आहे. इंडस्ट्री 4.0 च्या वेळी भारत डिजिटल क्रांतीचा चेहरा बनला आहे. व्यवसाय क्षमतांना समृद्धीमध्ये, अडथळ्यांना संधींमध्ये बदलू शकतो आणि यशाची आकांक्षा. मग ते लहान असो वा मोठे, जागतिक किंवा स्थानिक व्यवसाय प्रत्येकासाठी प्रगती सुनिश्चित करू शकतात."

भारताने जगाला परस्पर विश्वास दिला

2-3 वर्षांपूर्वी, आम्ही सर्वात मोठ्या महामारीतून गेलो होतो. या महामारीने प्रत्येक देश, समाज, व्यावसायिक घराणे आणि कॉर्पोरेट घटकांना एक धडा दिला. तो म्हणजे आपण परस्पर विश्वासात जास्तीत जास्त गुंतवणूक करणे आवश्यक आहे. महामारीच्या काळात भारताने जगाला परस्पर विश्वास दिला आहे. कोविड दरम्यान भारताने 150 हून अधिक देशांना औषधे पुरवली, असेही यावेळी बी-20 बिझनेस समिटमध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

जागतिक पुरवठा साखळीकडे जग कधीच त्याच दृष्टीने पाहू शकत नाही. गरजेच्या वेळी पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यावर ती कार्यक्षम म्हणता येईल का? या समस्येवर भारत हाच उपाय आहे. कार्यक्षमतेत आणि विश्वासार्ह जागतिक पुरवठा साखळीमध्ये भारताची महत्त्वाची भूमिका आहे, असे दिल्लीतील बी20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Modi in B 20 Summit : चांद्रयान 3 च्या यशाने यंदा 23 ऑगस्टपासूनच उत्सवाला सुरुवात

B-20 बिझनेस समिटमध्ये संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम चांद्रयान 3 च्या यशासाठी इस्रोचे कौतुक केले. यावेळी ते म्हणाले, की यंदा भारतात सणासुदीचा हंगाम 23 ऑगस्टपासून सुरू झाला. हा उत्सव म्हणजे चांद्रयान-3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा उत्सवा आहे. भारताच्या चांद्र मोहिमेच्या यशात इस्रोने महत्त्वाची भूमिका बजावली. यासोबतच भारतातील उद्योगांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

B-20 बिझनेस समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, "हा उत्सव भारताच्या विकासाला गती देण्यासाठी आहे. हा उत्सव नावीन्यपूर्णतेबद्दल आहे. हा उत्सव अवकाश तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वतता आणि समानता आणण्यासाठी आहे.

बिझनेस 20 (B20) हे G2 चे जागतिक व्यापारी समुदायासोबतचे अधिकृत संवाद मंच आहे. त्याची स्थापना 2010 मध्ये झाली आणि जी-20 च्या सर्वात प्रमुख सहभागी गटांपैकी एक आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news