Pankaja Munde : पाच वर्षांचा वनवास संपला! पंकजा मुंडे लढवणार बीड लोकसभेचा किल्ला

Pankaja Munde : पाच वर्षांचा वनवास संपला! पंकजा मुंडे लढवणार बीड लोकसभेचा किल्ला

Published on

बीड, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत भाजपा विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी त्यांची थोरली बहीण तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. ही चर्चा खरी ठरली असून भाजपाने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांचे नाव जाहीर केले आहे.

बीड जिल्हा हा स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राज्यात भाजपाची बांधणी करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या स्व. मुंडे यांनी सन- 2019 मध्ये पहिल्यांदा बीड लोकसभेची निवडणुक लढवली अन् ते विक्रमी मतांनी विजयी झाले. यानंतर सन 2014 मध्येही ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर क्रेद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. मात्र दुर्दैवाने अवघ्या आठ दिवसांनी त्यांचा दिल्ली येथे अपघाती मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर त्यांची कन्या प्रीतम मुंडे यांनी लोकसभेची पोटनिवडणुक लढवली. या निवडणुकीत प्रीतम मुंडे ह्या देशात विक्रमी मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम त्यांनी केला. सन- 2019 मध्ये देखील खा. प्रीतम मुंडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या.

दरम्यानच्या काळात पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणात सातत्याने डावलण्यात आले. राज्यसभा व विधान परिषदेसाठी त्यांच्या नावाची प्रत्येकवेळी चर्चा झाली परंतू न्याय मिळाला नाही. यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्याही प्रसिध्द झाल्या. खरेतर प्रीतम मुंडे यांचे काम चांगले व त्या प्रत्येकाचे फोन उचलत, त्यांच्या अडचणी फोनवरूनच मार्गी लावत. यामुळे विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांनाच उमेदवारी मिळेल, असे वाटत होते. परंतू राज्याच्या राजकारणात मागील दोन वर्षात मोठ्या उलथा- पालथी झाल्या. यामुळे राजकारणाची समिकरणेही बदलली. शिवसेने सोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतही फुट पडली. या बदलत्या समिकरणामुळे विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी पुढील काही समिकरणे जुळवण्यासाठी पंकजा मुंडे यांना भाजपाने लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्याची चर्चा आहे.

पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच बीड येथील भाजपा जिल्हा कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

बदलत्या राजकीय समिकरणाच्या खासदार प्रीतम मुंडे ठरल्या बळी

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यामुळे राज्याच्या राजकारणाची समिकरणेच बदलून गेली आहेत. शिंदेगट शिवसेना व अजीत पवार गट राष्ट्रवादीचा मित्रपक्ष बनल्यामुळे महायुतीत विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्याला तिकिट असा नियम आहे. परळीचे विद्यमान आमदार आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे हे आहेत. पुढे विधानसभेला धनंजय मुंडे यांना अडचण नको म्हणून अतिश चांगले काम असतानाही भाजपाने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करत परळी विधानसभेच्या दावेदार असलेल्या पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेेदवारी जाहीर केली आहे. यामुळे सध्यातरी परळी विधानसभेचा महायुतीतील उमेदवारीचा वाद संपुष्टात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news