![प्रेक्षकांसाठी गोवन चित्रपटांचे पॅकेज](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F11%2Fiffi-2.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पणजी : प्रभाकर धुरी गोव्यातील प्रेक्षकांना iffi मध्ये आजपासून गोवन चित्रपट पाहायला मिळणार आहेत. Iffi ने गोवेकरांनी बनवलेल्या सात चित्रपटांचे पॅकेज प्रेक्षकांसाठी आणले आहे. त्यातील पहिला चित्रपट 'गाथन ' आज शुक्रवारी सायंकाळी प्रदर्शित केला जाणार आहे.
इफ्फी सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सर्वांत सुंदर गोष्ट कोणती असेल तर, देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध भाषांमध्ये सांगितल्या गेलेल्या कथा.
यावर्षीही इफ्फीने गोव्यातील निर्मात्यांनी बनवलेल्या चित्रपटांचे खास पॅकेज महोत्सवात आणले आहे. या पॅकेजमधील चित्रपटांचे आज 24 रोजी पासून इफ्फीच्या विविध ठिकाणी प्रदर्शन करण्यात येणार आहे. गोवेकरांच्या या पॅकेजचा प्रारंभ आज 24 नोव्हेंबर रोजी आयनॉक्स स्क्रीन-4, पणजी येथे होत आहे. दिनेश पी. भोसले दिग्दर्शित कोकणी चित्रपट 'गाथन'चे प्रदर्शन सर्वात प्रथम करण्यात येणार आहे.
अन्य गोवन चित्रपटांच्या प्रदर्शनाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
1. गाथन
दिग्दर्शक : दिनेश पी. भोसले
प्रदर्शन स्थळ आणि वेळ : आयनॉक्स – स्क्रीन 4, पणजी 24.11.2023: संध्याकाळी 7.00
2. # एमओजी (हॅशटॅग एमओजी)
दिग्दर्शक : नीलेश मालकर
प्रदर्शन स्थळ आणि वेळ : मॅक्विंनेझ पॅलेस-1, पणजी 26.11.2023: दुपारी 2.20
3. क्रेझी मोगी.
दिग्दर्शक : क्रीस्ट सिल्वा
स्क्रीनिंग (प्रदर्शन) स्थळ आणि वेळ : मॅक्विनेझ पॅलेस-1, पणजी 27.11.2023: दुपारी 2.20 वा.
4. मारवट
दिग्दर्शक : राजाराम गोपाळ तुरी
स्क्रीनिंग स्थळ आणि वेळ : INOX- स्क्रीन 3, पणजी 27.11.2023: सकाळी 9.15
5. पीस लिली सॅन्ड कॅसल
दिग्दर्शक : हिमांशु सिंह
स्क्रीनिंग स्थळ आणि वेळ : INOX- स्क्रीन 3, पणजी 25.11.2023 : सकाळी 9.15
6. द विटनेस
दिग्दर्शक: ट्रॉय रिबेरो
स्क्रीनिंग स्थळ आणि वेळ : INOX- स्क्रीन 3, पणजी 27.11.2023: सकाळी 9.15
7 यशोदा
दिग्दर्शक : प्रवीण चौगुले
स्क्रीनिंग स्थळ आणि वेळ : INOX- स्क्रीन 3, पणजी 25.11.2023: सकाळी 9.15