गोव्यातील काँग्रेसच्या ८ आमदारांनी घेतली मुख्यमंत्री सावंत यांची भेट

काँग्रेस आमदार
काँग्रेस आमदार

पणजी : पुढारी वृत्तसेवा; काँग्रेसचे अकरापैकी आठ आमदार गोवा विधानसभा सचिवालयामध्ये दाखल झाले आहेत. माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील या आमदारांमध्ये मायकल लोबो, डिलायला लोबो, आलेक्स सिक्वेरा, रुडाल्फ फर्नांडिस, केदार नाईक, राजेश फळदेसाई व संकल्प आमोणकर यांचा समावेश आहे. काही वेळातच हे आमदार काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद साव़त हेही सचिवालयातच आहेत. दरम्‍यान या आमदारांनी डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन चर्चा केली. आता काँग्रेसकडे युरी आलेमाव, ॲडव्होकेट कार्लोस फेरेरा व एल्टन डिकोस्टा हे तीन आमदार राहणार आहेत.

गोव्यामध्ये काँग्रेसला योग्य नेतृत्व न मिळाल्यामुळे तसेच विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यास गोव्यातील आणि दिल्लीतील काँग्रेसचे नेते अपयशी ठरल्यामुळे गेले अनेक दिवस विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची रिकामी आहे. माजी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांना या पदावरून काँग्रेसने हटवले असले तरी त्यांच्या जागी दुसरा काँग्रेस विधिमंडळ नेता निवडला गेलेला नाही. काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी हे पदयात्रेमध्ये असल्याने व त्याच्याच भोवती सगळे काँग्रेसचे नेते असल्यामुळे गोव्यातील काँग्रेसच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसत नाहीत. काँग्रेसला गोव्यामध्ये कोणी विचारत नाही. काँग्रेसला योग्य नेता नाही आणि मतदारांची कामे व्हायला हवीत असा नाराजीचा सूर काँग्रेसचे आमदार व्यक्त करताना दिसतात.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news