Pakistani Drone : पाकिस्तानच्या घुसखोरी करणाऱ्या ड्रोनला बीएसएफच्या जवानांनी पाडले; 2 किलो हेरॉईन जप्त

Pakistani Drone
Pakistani Drone

पुढारी ऑनलाइन डेस्क : Pakistani Drone : भारत -पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानच्या घुसखोरी करणाऱ्या ड्रोनला (Pakistani Drone) भारतीय बीएसएफच्या जवानांनी पाडले. ड्रोन पाडल्यानंतर त्यातून दोन किलोचे हेरॉईनचे पॅकेट्स आढळून आले. हे पॅकेट जप्त करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत पाकिस्ताच्या पंजाब जेसीपी अटारी सीमा परिसरात तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना सोमवारी (दि.27) रात्री 8.20 च्या सुमारास पाकिस्तानकडून एक ड्रोन (Pakistani Drone) घुसल्याचे आढळले. त्यानंतर तातडीने या ड्रोनवर बीएसएफच्या जवानांनी गोळीबार केला. तसेच ड्रोनविरोधी उपाययोजना सक्रिय करून हे ड्रोन पाडण्यात आले. पाडलेल्या ड्रोनच्या झडती दरम्यान त्यातून 2 किलोचे हेरॉईन प्रतिबंधित पॅकेट सापडले, अशी माहिती बीएसएफ कडून देण्यात आली. एएनआयने ट्वीट करून ही माहिती पोस्ट केली आहे.

Pakistani Drone : अशी केली बीएसएफ जवानांनी कारवाई

अमृतसरमधील सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सोमवारी रात्री अमृतसर सेक्टरमधील भारत-पाक सीमेवर असलेल्या बॉर्डर ऑब्झर्व्हिंग पोस्टवर (BOP) पाकिस्तानी ड्रोन (Pakistani Drone) पाडले. सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास बीएसएफच्या जवानांना आंतरराष्ट्रीय सीमेच्या 700 मीटर आणि सीमा सुरक्षा (बीएस) कुंपणाच्या 350 मीटर आत पाकिस्तानकडून ड्रोन येत असल्याचा आवाज आला, त्यानंतर त्यावर गोळीबार करण्यात आला.

यानंतर जवानांनी रजतल पोस्टच्या संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि मंगळवारी सकाळी परिसरात शोध मोहीम सुरू केली. यावेळी बीएसएफ जवानांनी खराब झालेले काळ्या रंगाचे ड्रोन आणि त्याच्यासोबत बांधलेली पांढऱ्या रंगाची बॅग जप्त केली. बॅगेची तपासणी केली असता, बीएसएफला पिवळ्या रंगाच्या टेपने गुंडाळलेले एक पॅकेट आणि आतून एक टार्ट सापडले. एएनआयच्या माहितीनुसार त्यामध्ये तब्बल दोन किलोचे प्रतिबंधित केलेले हेरॉईन होते. सध्या बीएसएफचे जवान परिसरात सतत शोध मोहीम राबवून ड्रोनने फेकलेल्या इतर वस्तू शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Pakistani Drone : यापूर्वीही अनेकदा पाकिस्तानी घुसखोर ड्रोनला पाडले आहे

पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे घुसखोरी करून नशेचे पदार्थ पाठविण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्यावेळी देखील देशाच्या सतर्क बीएसएफ जवानांनी पाकिस्तानचे घुसखोरी करणारे ड्रोन पाडून त्यातील पदार्थ जप्त केले आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news