Pakistan Coach : ‘या’ दिग्गज माजी क्रिकेटपटूने नाकारली पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाची ऑफर

Pakistan Coach : ‘या’ दिग्गज माजी क्रिकेटपटूने नाकारली पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाची ऑफर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये सध्या मोठे बदल करण्यात येत आहेत. रमीज राजा यांच्या जागी जनम सेठी यांची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मोठे बदल झाले आहेत. नजम सेठी जुनी निवड समिती रद्द करत शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वात नव्या निवड समितीची नियुक्ती केली आहे. यानंतर ते पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षकांमध्येही मोठे बदल करणार आहेत. यासाठी त्यांनी पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांना आणखी एकदा पाकिस्तानचे प्रशिक्षक बनण्याची ऑफर दिली होती. मात्र, ऑर्थर यांनी त्यांचा प्रस्ताव नाकारला आहे. यानंतर वसीम आक्रम यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला काही प्रश्न केले आहेत. (Pakistan Coach)

सूत्रांच्या माहितीनुसार मिकी ऑर्थर म्हणाले, यापूर्वी मी पाकिस्तानचा प्रशिक्षक होतो, तेव्हा मला चांगले अनुभव आलेले नाहीत. त्यामुळे मी पाकच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. ऑर्थर जनम सेठी यांच्याशी बोलताना म्हणाले होते की, मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सल्लागारपदाची जबाबदारी स्वीकारण्यास इच्छुक आहे आणि मी सातत्याने पाकिस्तानचा दौराही करेन. ऑर्थर यांना २०१६ मध्ये पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. (Pakistan Coach)

यावेळी पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वसीम आक्रम यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वसीम आक्रम म्हणाले, पीसीबीमधील वातावरण सध्या चांगले नाही. त्यामुळे प्रशिक्षक पाकिस्तानमध्ये येण्यास नकार देत आहेत. वसीम सर्वांना भीती आहे की बोर्ड बदलल्यास करार संपूष्टात येईल. जर तुम्हाला विदेशातील प्रशिक्षक उपलब्ध होत नसेल तर पाकिस्तानातील प्रशिक्षकाची नियुक्ती करा. (Pakistan Coach)

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news