PAK vs NAM : पाकिस्तानचा सलग चौथा विजय

PAK vs NAM : पाकिस्तानचा सलग चौथा विजय
Published on
Updated on

अबुधाबी : पुढारी ऑनलाईन

PAK vs NAM : पाकिस्तानने ठेवलेल्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नांबिबियाने चांगली सुरुवात केली. ८ धावांवर वॅन लिंगेनच्या रुपात पहिली विकेट गेल्यानंतर सलामीवीर बार्ड आणि क्रेग विलियम्सने भागीदारी रचली. या दोघांनी ९ व्या षटकात संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले.

मात्र २९ धावांवर बार्ड धावबाद झाला. त्यानंतर विलियम्सने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने एरासमुसला साथीला घेत संघाला शतकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. मात्र एरासमुस १५ धावांवर बाद झाला. पाठोपाठ ४० धावा करणारा क्रेग विल्यम्सन देखील बाद झाला. जे स्मिथ २ धावांची भर घालून परतला. दरम्यान डेव्हिड वीजने ४३ धावांची झुंजार खेळी करत नांबिबियाला शतक पार करुन दिले.

मात्र नांबिबियाला २० षटकात ५ बाद ११० धावांपर्यंतच मजल मराता आली. पाकिस्तानने आपला चौथा विजय ४५ धावांनी साजरा केली.

तत्पूर्वी, टी २० वर्ल्डकपमध्ये आज पाकिस्तान विरुद्ध नांबिबिया यांच्यातील सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र नांबिबियाच्या गोलंदाजांची पॉवर प्लेमध्ये टिच्चून मारा करत मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम या सलामी जोडीला जखडून ठेवले.

दरम्यान, बाबर आझमने आक्रमक खेळी करत धावगती वाढवण्यास सुरुवात केली. बाबरच्या खेळीने १० व्या षटकात संघाचे अर्धशतक धावफलकावर लागले. बाबर आझमने आपले अर्धशतक ३९ चेंडूत पूर्ण केले. दरम्यान, रिझवाननेही आपली धावगती वाढवण्यास सुरुवात केली. या दोघांनी नाबाद शतकी सलामी दिली.

मात्र १५ व्या षटकात ४९ चेंडूत ७० धावा ठोकणारा बाबर आझम बाद झाला. त्याला वीजने बाद केले. त्यानंतर आलेला फखर झमान देखील ५ धावांची भर घालून फ्रँकलिनच्या गोलंदाजीवर बाद झाला. दोन विकेट पाठोपाठ पडल्यानंतर आलेल्या मोहम्मद हाफिज आणि रिझवान यांनी आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली.

१८ व्या षटकात पाकिस्तानने १५० धावांचा टप्पा पार केला होता. रिझवान देखील आपल्या अर्धशतकाजवळ पोहचला होता. त्याने षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने अखेरच्या षटकात २४ धावा चोपून पाकिस्तानला १८९ धावांपर्यंत पोहचवले. रिझावने ५० चेंडूत नाबाद ७९ धावा केल्या तर मोहम्मद हाफिजने १६ चेंडूत ३२ धावांची आक्रमक खेळी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news