Padma Awards : मोठी बातमी! पद्म पुरस्कारांची घोषणा

Padma Awards : मोठी बातमी! पद्म पुरस्कारांची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला गुरुवारी (दि. २५) पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा करण्यात आली. यामध्ये विविध क्षेत्रात नाव लौकीक मिळवलेल्या व्याक्तीचा गौरव करण्यात आला आहे. पार्वती बरुआ, जागेश्वर यादव, चार्मी मुर्मू, सोमन्ना, सर्वेश्वर, संगथम यांच्यासह अनेक मोठ्या नावांचा यामध्ये समावेश आहे.

पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होणार्‍या सन्मानितांची नावे समोर आली आहेत. 23 जानेवारीलाच बिहारचे माजी मुख्यमंत्री कुरपरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली होती.

 पद्म पुरस्कार

1- पार्वती बरुआ, ६७ वर्षे, आसाम, सामाजिक कार्य (पशु कल्याण)

2- जागेश्वर यादव, 67 वर्षे, छत्तीसगड सामाजिक कार्य (आदिवासी)

3- चामी मुर्मू, 52 वर्षे, झारखंड सामाजिक कार्य (पर्यावरण)

4- गुरविंदर सिंग, 53 वर्षे, हरियाणा, सामाजिक कार्य (अपंग)

5- सत्य नारायण बलेरी, 50 वर्षे, केरळ (कृषी)

6- दुक्खू माझी, 78 वर्षे, पश्चिम बंगाल सामाजिक कार्य (पर्यावरण)

7) के चेल्लामल, ६९ वर्षे, अंदमान निकोबार (शेती)

8- संघांकिमा, 63 वर्षे, मिझोराम, सामाजिक कार्य (मुले)

9- हेमचंद्र माझी, ७० वर्षे, छत्तीसगड (आयुष)

10- यानुंग जामोह लेगो, 58 वर्षे, अरुणाचल प्रदेश (कृषी)

11- सोमन्ना, 66 वर्षे, कर्नाटक, सामाजिक कार्य (आदिवासी)

12- सर्वेश्वर बासुमेटरी, ६१ वर्षे, आसाम, (कृषी)

13- प्रेमा धनराज, 72, कर्नाटक (औषध)

14- उदय विश्वनाथ देश पांडे, 70 वर्षे, महाराष्ट्र (मलखांब प्रशिक्षक)

15- याज्की मॉंकशॉ इटालिया, 72 वर्षे, गुजरात (स्वदेशी-सिकल सेल)

16- शांती देवी पासवान आणि शिवन पासवान, मधुबनी बिहार (चित्रकला)

17- रतन कहार, 88 वर्षे, पश्चिम बंगाल, कला (लोकगीत गायन)

18- अशोक कुमार बिस्वास, 67 वर्षे, बिहार (चित्रकला)

19- बालकृष्ण सदनम पुथिया वीथिल, ७९ वर्षे, केरळ, कला, (कथकली)

20- उमा माहेश्वरी डी, 63 वर्षे, आंध्र प्रदेश, कला (कथा सांगणे)

21- गोपीनाथ स्वैन, 105 वर्षे, ओरिसा, कला (भजन गायन)

22- स्मृती रेखा चखमा, 63 वर्षे, त्रिपुरा कला (वस्त्र)

23- ओमप्रकाश शर्मा, 85 वर्षे, मध्य प्रदेश कला (थिएटर-लोक)

24- नारायण ईपी, 67 वर्षे, केरळ कला (नृत्य)

25- भागवत प्रधान, 85 वर्षे, ओरिसा, कला (नृत्य)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news