‘गोली मारो…!’ सारखे वक्तव्य अनुराग ठाकूर यांनी केले, तरी आश्चर्य वाटायला नको : पी. चिदंबरम

‘गोली मारो…!’ सारखे वक्तव्य अनुराग ठाकूर यांनी केले, तरी आश्चर्य वाटायला नको : पी. चिदंबरम

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात कोरोना महारोगराईच्या धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी 'भारत जोडो' यात्रेवर निशाणा साधाला आहे. काँग्रेस केवळ एकाच कुटुंबाचा विचार करीत आहे, असा टोला ठाकूर यांनी गांधी कुटुंबियांचे नाव न घेता लगावला होता. ठाकूर यांच्या वक्तव्याला मात्र काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे.

अनुराग ठाकूर बडे मंत्री आहेत. आम्ही छोटे लोक आहोत. 'गोली मारो…!' सारखे वक्तव्य त्यांनी केले, तरी आश्चर्य वाटायला नको, असा टोला काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी शनिवारी लगावला. भारत जोडो यात्रेला मिळत असलेल्या समर्थनाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यात्रेला मिळत असून लोक एक होत आहेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

चीन, कोरिया तसेच जपानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. परंतु काँग्रेसला केवळ एका परिवाराची चिंता आहे, अशी प्रतिक्रिया शनिवारी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली होती. कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याची ही वेळ आहे. कोरोना संसर्गग्रस्त आढळलेल्या काँग्रेसच्या इतर नेत्यांप्रमाणे राहुल गांधी हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आले होते का ? त्यांना विलगीकरणात पाठवण्यात आले आहे का? असे सवाल ठाकूर यांनी राहुल गांधी यांना विचारला होता. भ्रष्टाचारींना जोडण्यासाठी काँग्रेसची ही यात्रा आहे. त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या भल्याऐवजी देशाचा विचार केला पाहिजे, असे आवाहन ठाकूर यांनी केले होते.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news