OTT Platform : ‘बोल्ड सीन’बद्दल अभिनेत्री रसिका दुगल म्हणते…

OTT Platform : 'बोल्ड सीन'बद्दल अभिनेत्री रसिका दुगल म्हणते...
OTT Platform : 'बोल्ड सीन'बद्दल अभिनेत्री रसिका दुगल म्हणते...

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनोरंजनाच्या दुनियेत वेबसीरिजचं प्रस्थ वाढतंच चाललंय. लोकांची प्रचंड लोकप्रियता काही वेबसीरिजना मिळत आहे. या ओटीटी (OTT Platform) प्लॅटफाॅर्मवरील वेबसीरिजमध्ये रसिका दुगल नावाच्या अभिनेत्रीने आघाडीचं स्थान मिळवलं आहे. तिचा अभिनय आणि तिची शैली पाहून 'ओटीटी क्वीन' आणि 'गेमचेंजर' म्हणून संबोधलं जातं आहे.

ह्युमरसली युवर्स ते मिर्झापूर-आऊट ऑफ लव्ह या वेबसीरिजपर्यंत तिने साकारलेल्या भूमिका वाखणण्याजोग्या आहेत. मिर्झापूर-२ आणि लूटकेस या चित्रपटांमध्ये वठवलेल्या भूमिकांबद्दल रसिका दुगल हिला इंडियन फिल्म फेस्टिव्हल मेलबर्नमध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' म्हणून नामांकनही मिळालं आहे.

रसिका एका मुलाखतीत म्हणते की, "खरंतर लेखक आणि निर्माता हे गेमचेंजर आहेत. जर त्यांनी या वेबसीरिजचे (OTT Platform) काम हाती घेतले नसते आणि लेखकाने लिहिलेच नसते, तर मला संधीच मिळाली नसती. मागील २ वर्षांपूर्वी एक अभिनेत्री म्हणून मला जरी संधी मिळाली असली, तरी लेखकांनी चौकटीबाहेर जाऊन लिखाण केले आणि निर्मात्यांनी त्यावर विश्वास ठेवला. ते लेखक फार लोकप्रिय नव्हते. पण, त्यावेळी त्यांचं लिखाण नक्कीच दर्जेदार होतं."

"अशा गेमचेंजर लेखकांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. त्यामुळेच वेगळ्या धाटणीच्या भूमिका मला करता आल्या. पात्रांसोबत वेगवेगळे प्रयोग करता आले. या भूमिकांमधून मला काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळेल, या विचारांतूनच मी हे प्रोजेक्ट स्वीकराले", असेही मत रसिका दुगल मांडते.

ती पुढे म्हणते की, "जेव्हा तुम्ही एखाद्या स्क्रिप्ट सहज सामावून जाता, तेव्हा तुमच्या अभिनयाचे काम निम्मे पूर्ण झालेले असते. त्यावेळी तुम्ही फक्त स्क्रिप्ट फाॅलो करायची असते. जेव्हा तुम्हाला हे जमत नाही तेव्हा तुम्ही अभिनयातील मूलभूत बाबींशी झगडत राहता. तुम्ही तुमच्या पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न करता असता तेव्हा त्या गोष्टी स्क्रिप्ट असायला हव्यात. मिर्झापूर आणि लेटकेसमधील भूमिकांमध्ये वेगळेपण होतं. असं वेगळंपण करण्यासाठी धडपडत असते."

मिर्झापूरमध्ये बिना त्रिपाठी प्रभावी का ठरली? 

मिर्झापूरमध्ये बिना त्रिपाठी हे पात्र होतं. त्या पात्राने हे सिद्ध केलं आहे की, एखाद्या चित्रपटात किंवा वेबसीरिजमध्ये किती वेळेची भूमिका मिळाली आहे, हे महत्वाचं नाही. यामध्ये इतर कलाकारांना जास्त वेळ मिळाला आहे. पण, मला वाटते की उत्तम लिहिलेल्या स्क्रिप्टमध्ये आवश्यक तो वेळ पात्रांना दिलेला असतो. तो जास्तही नसतो किंवा कमीही नसतो. बिना त्रिपाठीला मिर्झापूरमध्ये जास्त वेळ दिलेला नाही. तरीही ती जास्त प्रभावी ठरते.

रसिका बोल्ड सीनबद्दल काय म्हणते?

मी बोल्ड आणि नाॅट बोल्ड यामध्ये फरक करत नाही. ऑऊट ऑफ लव्ह या वेबसीरिजचा विचार केला की, ही स्टोरी एक स्त्री आणि पुरुषामधील सामान्य संबंधाविषयी आहे. त्यामुळे त्यात काहीतरी वेगळं आणि ठळक आहे, असं मला वाटतच नाही. जर त्या स्क्रिप्टला स्वच्छ अर्थ असेल आणि सौंदर्य दाखविण्याची गरज असेल, मी ते नाकारणार नाही. कलाकारांविषयी आपल्या आजुबाजूला वावणाऱ्या लोकांच्या मनात आदर असणं आवश्यकच आहे.

चित्रिकरणाच्या वेळी सर्व सेटवरील काम करणाऱ्या पुरुष, अभिनेते आणि अभिनेत्री यांच्याबद्दल अत्यंत संवेदनशील होते. त्यामुळे चित्रिकरण करत असताना प्रत्येक दृश्यं ही काळजीपूर्वक आणि व्यवसायिक दृष्टीकोन लक्षात ठेवून हाताळली गेली आहेत. बोल्ड दृश्यं ही संकल्पनाही दिग्दर्शकांकडून वापरली जात आहेत, मला वाटतं चांगली गोष्ट आहे. अशावेळी जे कोणी सन्मानाने आणि संवेदनशीलता वागत नाहीत, त्यांना त्या प्रोजेक्टमधून काढून टाकण्याचा अधिकार आहे.

या अभिनेत्रींचे हाॅट फोटो पाहिलेत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news