कुर्ला न्यायालयात महानगर दंडाधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या माथेफिरुला अटक 

कुर्ला न्यायालयात महानगर दंडाधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या माथेफिरुला अटक 
Published on
Updated on

धारावी, पुढारी वृत्तसेवा : एका प्रलंबित खटल्याकरिता कुर्ला कोर्टातील महानगर दंडाधिकाऱ्याला धाकटपटशा दाखविण्यासाठी चप्पल फेकणाऱ्या माथेफिरुला कुर्ला पोलिसांनी शनिवारी (दि.२) मोठ्या शिताफीने अटक केली आहे. जावेद सुभाष शेख उर्फ प्रदीप सुभाष तायडे (वय ४० वर्ष) असे त्याचे नाव असून तो मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरचा रहिवासी आहे. याप्रकरणी त्याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे यासह अनेकविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कुर्ला पोलीस ठाण्याचे पोउनि अभिमन्यू पाटील अधिक तपास करत आहेत.

मागील काही वर्षांपासून कुर्ला पश्चिम येथील महानगर दंडाधिकारी ६० वे न्यायालयात फिर्यादी आणि जावेद शेख यांच्यात खटला सुरु आहे. शनिवारी कोर्टाची तारीख असल्याने जावेद शेख सकाळीच न्यायालयात पोहचला होता. खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागावा अशी मनोमन त्याची इच्छा होती. शनिवारी नेहमीप्रमाणे कुर्ला कोर्टात न्यायालयाचे कामकाज सुरु झाले. जावेद शेख चे नाव उच्चारताच तो महानगर दंडाधिकारी अ. अ. धूमकेकर यांच्या समक्ष उभा झाला. आणि त्याचे विरुद्ध प्रलंबित असलेल्या खटल्याचा लवकरात लवकर त्याच्या मनाप्रमाणे निकाल लावून त्याला कोर्टाच्या फेऱ्यातून मुक्त करावे अशी मागणी करत तो आरडाओरडा करू लागला. दंडाधिकाऱ्याने तात्काळ सायलेन्स सायलेन्स असे उच्चारताच त्याचा राग अनावर झाला लागलीच त्याने दंडाधिकाऱ्यांना धाकटपटशा दाखविण्यासाठी त्याच्या जवळील चप्पल काढून दंडाधिकाऱ्याला फेकून मारली.

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news