कुर्ला येथे म्हाडाच्या इमारतीचे छत कोसळून एका बालकाचा मृत्यू

कुर्ला येथे म्हाडाच्या इमारतीचे छत कोसळून एका बालकाचा मृत्यू

मुंबई : पुढारी वृत्तसेवा: कुर्ला पश्चिमेकडील राम मनोहर लोहीया मार्गावर असलेल्या हायटेक परिसर येथे सोमवारी (दि.२८) रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एका म्हाडाच्या इमारतीच्या तळमजल्यावरील छताचे बांधकाम कोसळले.

यात शॉपिग सेंटरच्या पहिल्या मजल्याच्या छताचा भाग तळमजल्यावर असलेल्या उपहार गृहावर कोसळला. या घटनेत जखमी झालेल्या चारपैंकी एका पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. सर्व जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

राजावाडी रुग्णालयाचे सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार चार जखमींपैकी एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर घटनेतील इतर तिघांना उपचार सुरू आहेत. या घटनेत अफान खान, ( वय ५) यांचा मृत्यू तर रफीक शेख ( वय ४६), इरफान खान, ( वय ३३) आणि मोहम्मद जिकरान (वय ६) अशी जखमींची नावे आहेत.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news