खासदाराच्या घराची रेकी केल्याने संशयिताला अटक

खासदाराच्या घराची रेकी केल्याने संशयिताला अटक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  तुणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या निवास्थानाबाहेर संशयास्पद हालचाली करुन हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या राजाराम रेगे या संशयितास माहीम येथून कोलकाता पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली. रेगेला पुढील चौकशीसाठी कोलकाता येथे नेण्यात आले आहे.

26/11 च्या हल्ल्यासारखीच ही योजना आखण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अभिषेक बॅनर्जी हे तूणमुल काँग्रेसचे खासदार व राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या निवासस्थानी अज्ञाताकडून रेकी करण्यात आली होती. या व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्याने त्यांनी स्थानिक पोलिसांत तक्रार केली होती. या घटनेमागे कुठल्या अतिरेकी संघटनेचा सहभाग आहे का या अनुषंगाने कोलकाता पोलिसांनी तपास सुरु केला होता.

या गुन्ह्यांत राजाराम रेगे याचा सहभाग उघडकीस आला होता. तो माहीम परिसरात राहत असल्याची माहिती प्राप्त होताच कोलकाता पोलिसांचे एक विशेष पथक मुंबईत आले. या पथकाने माहीम पोलिसांच्या मदतीने चार दिवसांपूर्वी माहीम येथून राजाराम रेगेला ताब्यात घेतले. त्याला अटक केल्यानंतर पुढील चौकशीसाठी कोलकाता येथे नेण्यात आले.

26/11 च्या आत्मघाती हल्ल्यातील मुख्य आरोपी हेव्हीड हेडलीचा राजाराम हा कथित मित्र असल्याचे बोलले जाते. मुंबईतील हल्ल्यापूर्वी डेव्हीड हा राजारामला भेटला होता. शिकागो येथील एका स्थानिक न्यायालयात एका व्यक्तीला दादर येथील शिवसेना भवनात भेटल्याची कबुली दिली होती. अभिषेक बॅनर्जी यांच्या घराजवळील एका सीसीटिव्ही फुटेजमध्ये तो दिसला होता. कोलकाता येथे वास्तव्यास असताना त्याची दक्षिण कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

याच दरम्यान त्याने अभिषेक बॅनजी व त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यानंतर त्याने त्यांना फोन करुन भेटण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र त्याची भेट झाली नाही. राजाराम हा काही संशयित व्यक्तींच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्याची कोलकाता पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news