पुढारी ऑनलाईन डेस्क : नोरा फतेही ( Nora Fatehi ) ही तिच्या आगामी 'मडगाव एक्स्प्रेस' या सिनेमामुळे चर्चेत आली आहे. या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नुकतेच 'मडगाव एक्स्प्रेस' सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. 'मडगाव एक्स्प्रेस' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नोरा आणि टीमने मेट्रोतून प्रवास केला. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. यात नोरा आणि 'मडगाव एक्स्प्रेस'चे दिग्दर्शक कुणाल खेमू मेट्रो स्थानकावर दिसत आहेत.
मेट्रोने प्रवास केल्यानंतर ते प्रवाशांबरोबर डान्सही करताना दिसत आहेत. त्याचाही हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'मडगाव एक्स्प्रेस' सिनेमातून अभिनेता कुणाल खेमू दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. या सिनेमात नोरासह प्रतीक गांधी, दिव्येंदू शर्मा, करिना कपूर, विकी कौशल, अविनाश तिवारी हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमयेही या सिनेमात झळकणार आहे. येत्या 22 मार्चला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होईल. ( Nora Fatehi )