Winter Session Press Conference : ‘तिजोरीवर कितीही ताण पडला तरी आम्ही खंबीर’ : मुख्यमंत्री शिंदे

Winter Session Press Conference : ‘तिजोरीवर कितीही ताण पडला तरी आम्ही खंबीर’ : मुख्यमंत्री शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपूरमध्ये बुधवारी (दि. 6) हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना सीएम एकनाथ शिंदे यांनी सरकार योग्य ते निर्णय घेत असल्याचे सांगितले. तिजोरीवर कितीही ताण पडला तरी आम्ही शेतकऱ्यांसाठी आणि इतर सर्व निर्णय घेण्यासाठी खंबीर आहोत असं सीएम शिंदे यांनी यावेळी सांगितले.

माध्यमांशी संवाद साधत असताना, तोंड उघडण्याआधी विचार करायला शिका असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. आमच्या सरकारचे विदर्भात दुसरं अधिवेशन आहे. या हिवाळी अधिवेशनात विदर्भ आणि मराठवाड्यावर विशेष लक्ष असतं. मी असे अश्वासन देतो की विदर्भ आणि मराठवाड्यासाठी विशेष अशा उपाययोजना केल्या जातील असं सीएम शिंदे म्हणाले.

विरोधकांनी अनेक आरोप केलेले आहेत. पण जनतेनं नुकत्याच झालेल्या विधानसभेमध्ये आमच्या सरकारला कौल दिला आहे. काहींनी आमच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला इव्हेंट अशी टीका केली आहे. पण जवळपास अनेकांना या कार्यक्रमातून लाभ मिळाला आहे अशी माहिती शिंदे यांनी दिली.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा दिलेला आहे. नमो शेतकरी योजना दिलेली आहे. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे जिथे ही योजना लागू केलेली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. तिजोरीवर कितीही ताण पडला तरी आम्ही खंबीर असल्याचे देखील शिंदे यावेळी म्हणाले.

गुन्हेगारीवर बोलत असताना शिंदे म्हणाले की, आमचं सरकार हे गुन्हे वाचवून कातडी वाचवणारे सरकार नाही तर सत्याचं सरकार आहे. आम्ही सुडभावनेनं कोणताही निर्णय घेणार नसल्याचेही सीएम शिंदे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news