Lok Sabha Election 2024 : नागपूर, रामटेक महायुती नामांकन; उद्या शक्तिप्रदर्शन, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री येणार

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रामटेक लोकसभा मतदार संघाचे उमेदवार राजू पारवे उद्या बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मंगळवारी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने कधी नव्हे ते काँग्रेस नेत्यांचे एकजुटीचे आणि हजारो कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन पहायला मिळाले. ( Lok Sabha Election 2024 )

संबंधित बातम्या 

रामटेक लोकसभा मतदारसंघातील माजी मंत्री सुनील केदार गटाच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे या देखील उद्याच नामांकन दाखल करणार आहेत. दरम्यान, उद्या भाजप-शिवसेना महायुतीचे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहणार आहे. यासोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी राज्यमंत्री श्रीमती सुलेखाताई कुंभारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते प्रशांत पवार, लोक जनशक्ती पार्टीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष सतीश लोणारे उपस्थित राहणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यापूर्वी नितीन गडकरी संविधान चौकात सकाळी ९.३० वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बख्त बुलंद शहा चौकात गोंड राजे बख्त बुलंद शाह यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होणार आहेत. ( Lok Sabha Election 2024 )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news