पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगातील निवडणूक आयुक्तांच्या २ रिक्त पदांवर आज नवीन नियुक्ती करण्यात आली. यामध्ये पंजाबच्या सुखबीर सिंग संधू यांच्या नावाचा समावेश आहे. एसएस संधू हे आयएएस अधिकारी आहेत. ते नुकतेच उत्तराखंडच्या मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाले आहेत. आता एसएस संधू यांच्याकडे लोकसभा निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी आली आहे.
सुखबीर सिंग संधू हे 1988 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अमृतसरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ते एमबीबीएस उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी गुरु नानक देव विद्यापीठातून इतिहास आणि कायदा या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ते नुकतेच उत्तराखंडच्या मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाले आहेत. भारत सरकारने एका वर्षाच्या कालावधीसाठी लोकायुक्तांचे सचिव म्हणून नियुक्ती केली होती.
संधू यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांची जुलै 2021 मध्ये ओम प्रकाश यांच्या जागी उत्तराखंडचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ते 30 सप्टेंबर रोजी उत्तराखंड सरकारच्या मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाले.
संधू हे तेव्हा त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने जारी केलेल्या नियुक्ती पत्रानुसार संधू यांची एक वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना 31 जानेवारी 2024 पर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. यानंतर ते निवृत्त झाले आणि त्यांची एक वर्षाच्या कालावधीसाठी केंद्रातील लोकायुक्तांचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. आता त्यांच्यावर लोकसभेची मोठी जबाबदारी आहे.