नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : रस्त्यावर चुकीच्या पध्दतीने गाडी पार्क असल्याचे छायाचित्र पाठविणाऱ्यांना 500 रुपयांचे बक्षीस देण्याची नवी योजना लवकरच सुरु केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना दिली.
चुकीच्या पध्दतीने गाडी पार्क असल्याचे छायाचित्र पाठविणाऱ्यांना 500 रुपयांचे बक्षीस मिळेल. तसेच ज्या व्यक्तीचे वाहन असेल त्याला एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असे सांगून गडकरी पुढे म्हणाले की, रस्त्यावर चुकीच्या वाहने पार्किंग करण्याची पध्दत वाढत चालली आहे. अशा प्रवृतीला रोखण्यासाठी नवीन कायदा आणला जाणार आहे. लोक आपल्या वाहनांसाठी पार्किंगची जागा बनवत नाहीत तर चुकीच्या पध्दतीने कुठेही रस्त्यावर वाहने उभी करतात. ही प्रवृत्ती बंद होणे गरजेचे आहे. भारतात मोटरकार पार्किंगची मोठी समस्या आहे. लोक कुठेही गाडी उभी करुन निघून जातात. दुर्दैवाने याचा त्रास इतर लोकांना होतो.
हेही वाचा