NEW CDS OF INDIA : देशाला मिळाला नवा सीडीएस, बीपीन रावत यांच्या मृत्यूनंतर ९ महिन्यानंतर नियुक्ती

NEW CDS OF INDIA
NEW CDS OF INDIA
Published on
Updated on
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस म्हणून ले. ज. अनिल चौहान (सेवानिवृत्त) यांची केंद्र सरकारकडून बुधवारी (दि.२८) नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन सीडीएस बिपीन रावत यांचे तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. त्यानंतर गेल्या 9 महिन्यांपासून हे पद रिकामे होते. (NEW CDS OF INDIA)
सीडीएस पदावर अनिल चौहान यांची नियुक्ती केली जात असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे. चौहान यांच्याकडे सीडीएस पदाशिवाय लष्करी घडामोडीविषयक विभागाच्या संचालक पदाचा कार्यभार असेल. लष्करात चाळीस वर्षे सेवा बजावलेल्या चौहान यांनी अनेक कमांडचे प्रमुख म्हणून काम केलेले आहे. जम्मू काश्मीर तसेच ईशान्य भारतातील दहशतवादी संघटनांविरोधातील अनेक मोहिमांचे यशस्वी नेतृत्व त्यानी केलेले आहे. (NEW CDS OF INDIA)
सीडीएस पद स्वीकारणारे रावत यांच्यानंतरचे अनिल चौहान हे दुसरे लष्करी अधिकारी ठरणार आहेत. १९८१ साली ११ गोरखा रायफल्समध्ये सामील झालेले चौहान हे नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला तसेच इंडियन मिलिट्री अकॅडमी डेहराडूनचे माजी विद्यार्थी आहेत. मेजर जनरल पदावर असताना चौहान यांनी काश्मीरमधील बारामुल्ला येथे इन्फंट्री डिव्हिजनचे जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर लेफ्टनंट जनरलपदावर असताना ईशान्य भारतात एका कोअरची जबाबदारी सांभाळली होती. सप्टेंबर २०१९ मध्ये ते पूर्व विभागाचे कमांडिंग-इन-चीफ बनले. त्यानंतर ३१ मे २०२१ मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते. (NEW CDS OF INDIA)
हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news