नागपूर : भाजप नेत्या सना खान यांच्या मारेकऱ्यांना १८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी

नागपूर : भाजप नेत्या सना खान यांच्या मारेकऱ्यांना १८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सना खान यांची आर्थिक वादातून हत्या झाल्याचे उघड झाले असून एप्रिलमध्येच मारेकरी अमित आणि सना यांचे लग्नही झाल्याचे उघडकीस आले आहे. जबलपूर येथून कुख्यात गुन्हेगार असलेल्या अमित शाहू आणि त्याच्या  साथीदारांना दोघांना अटक करुन नागपुरात आणण्यात आले. न्यायालयाने आरोपींना १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. प्रारंभिक तपासात काठीने मारहाण करीत अमितने आपल्याच धाब्यावर सना खानची हत्या केली. मात्र, नदीपात्रात सना खान यांच्या मृतदेहाचा अजूनही पत्ता न लागल्याने पोलीस यंत्रणेपुढे प्रश्नचिन्ह कायम आहे.

याबाबतची अधिकची माहिती अशी की,  १ ऑगस्टला सना खान रात्री तडकाफडकी नागपूरवरून जबलपूरला गेल्या सकाळी पोहचल्याचा फोन आला. मात्र यानंतर कुठलाही संपर्क न झाल्याने त्या बेपत्ता झाल्याची तक्रार आईने मानकापूर पोलिसात दिली. अखेर कुटुंबियांच्या पोलीस तक्रारीनंतर मानकापूर पोलीसाची दोन पथके जबलपूरकडे रवाना झाली. सना खान ५० लाख घेण्यासाठीच अमितकडे गेल्याचे कळते. याच घटनाक्रमात अमित शाहूच्या घरुन सकाळी भांडणाचा आवाज आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मात्र, जबलपूर पोलिसांच्या  शोधमोहीमेत आठवडा उलटूनही थांगपत्ता न लागल्याने व्यावसायिक स्पर्धेतून हत्येचा संशय व्यक्त केला गेला.

पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर पोलिसांच्या चमूने अथक परिश्रमातून एकेक धागा जुळवला. व्यावसायिक संबंधातून या दोघांचे सूत जुळले. इतकेच नव्हे तर या दोघांनी एप्रिलमध्ये लग्नही केल्याचे तपासात उघड झाले असून कुटुंबियांना देखील थांगपत्ता नसल्याचे समजते. मोहसीन खान नामक भावानेही यास दुजोरा दिल्याची माहिती आहे. आता ही हत्या आर्थिक कारणावरून की आणखी कशातून करण्यात आली याचा उलगडा लवकरच पीसीआर दरम्यान आरोपीकडून पोलिस तपासात होणार आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news