नागपूर : पुढारी वृत्तसेवा नागपूर ग्रामीण पोलिसांनी 50 पेक्षा जास्त ठिकाणी चोरी करण्याऱ्या एका टोळीला अटक केली. ह्या टोळ्या नागपूर आणि मध्यप्रदेशमध्ये चोऱ्या करत होत्या. नागपूर ग्रामीण पोलिसांनी या टोळीमधील 4 आरोपींना ताब्यात घेतले असून, आणखी आरोपी लवकरच जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. या विषयी माहिती नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली.
या विषयी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, संशयीत आरोपी शहबाज, जुबेल हे दोघे दिवसा बंद घर असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरी करत असत. हे दोघेही चोरी करून मुद्देमाल सलाउद्दीनकडे आणून द्यायचे. सलाउद्दीन सोनार योगेश श्रीरंगला सबोत घेऊन या मालाची विल्हेवाट लावायचा. आरोपींनी नागपूर जिल्हातील 17 चोऱ्या, 3 वर्धा आणि 1 मध्यप्रदेशातील चोरीची कबुली दिली आहे. या सोबतच पोलिसांनी आतापर्यंत 21 गुन्ह्यातील 18 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा :