RBI on 500₹ Note : 500 रुपयांच्या ‘कोट्यवधी’ नोटा गायब नाहीत; RBI कडून स्पष्टीकरण

RBI on 500₹ Note : 500 रुपयांच्या ‘कोट्यवधी’ नोटा गायब नाहीत; RBI कडून स्पष्टीकरण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : RBI on 500₹ Note : गेल्या 3 दिवसांपूर्वी नाशिक, देवास, बंगळूर येथील छापखान्यांतून 500 रुपयांच्या कोट्यवधी नोटा गायब झाल्याच्या वृत्तावर आरबीआयकडून (RBI-रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) खंडन करण्यात आले आहे. आरबीआयने याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. आरबीआयने प्रेस रिलीज जारी केले आहे. यामध्ये त्यांनी 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्याचे वृत्त चुकीचे आहे, असे म्हटले आहे.

नाशिक, देवास आणि बंगळूरमधील छापखान्यांतून पाचशे रुपयांच्या 1 हजार 761 दशलक्ष नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेत पोहोचण्याआधीच लंपास झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या कालावधीत रघुराम राजन हे गव्हर्नर होते; पण त्या नोटांवर स्वाक्षरी कोणाच्या होत्या, हा प्रश्न निर्माण झाला आहे. गायब झालेल्या सर्व नोटा नवीन डिझाईनच्या असून, त्याचे मूल्य 880 अब्ज 32 कोटी 50 लाख रुपये (8,80,32,50,00,000) इतके आहे. छपाई केलेल्या नोटांपैकी 7 हजार 260 दशलक्ष इतक्याच नोटा पोहोचल्या असल्याचे खुद्द रिझर्व्ह बँकेनेच उघड केल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत खळबळ उडाली आहे. (RBI on 500₹ Note)

मनोरंजन रॉय यांनी आरटीआय अंतर्गत काही प्रश्न विचारून माहिती मागवली होती. त्या माहितीच्या विश्लेषणानुसार आरबीआयकडे नोटा पोहोचण्यापूर्वीच गायब झाल्या आहेत, अशी माहिती समोर आली होती.

RBI on 500₹ Note : आरटीआयच्या माहितीचा चुकीचा अर्थ काढण्यात आला

मात्र, आरबीआयने म्हटले आहे, या आरटीआयमधील माहितीची चुकीची व्याख्या करण्यात आली आहे. या कारणामुळे हे वृत्त पसरले आहे. चुकीचा अर्थ काढण्यात आल्याने हा गैरसमज निर्माण झाल्याचे आरबीआयने म्हटले आहे. तसेच आरबीआयने असेही म्हटले आहे. प्रिंटिंग प्रेसमध्ये छापलेल्या नोटा पूर्णपणे सुरक्षित आहेत. (500 RS Note)

बँक नोटांचे उत्पादन, साठवणूक आणि वितरण यावर संपूर्ण प्रोटोकॉलसह आरबीआयद्वारे देखरेख केली जाते आणि यासाठी एक मजबूत यंत्रणा अस्तित्वात आहे. आरबीआयने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश्वर दयाल यांच्या वतीने लिहिले आहे की, अशा कोणत्याही माहितीसाठी सर्वांनी आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या माहितीवरच अवलंबून राहावे, असे आवाहन देखील केले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news