तस्करीच्या धंद्यात जेनाबाई कशी शिरली?
देश स्वतंत्र झाला. पण, देशात अन्नधान्यासाठी नागरिकांची परवड सुरू झाली. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने स्वस्त दरात रेशन देण्यास सुरू केलं. आपलं आणि आपल्या ५ मुलांचं पोट चालविण्यासाठी जेनाबाई तांदूळ विकण्याच्या धंद्यात सुरू शिरली. इथूनच जेनाबाईने तांदळाची तस्करी करण्यास सुरूवात केली.
पण, त्यात तिला नुकसान झाले. त्यानंतर दारूच्या धंद्यात जेनाबाईने प्रवेश केला. डोंगरीच्या झोपडपट्टीमध्ये दारूचा धंदा सुरू केला. दारू तयार करणे आणि ती विकणे, हा जेनाबाईचा व्यवसाय झाला. दारूच्या व्यवसायात जेनाबाईचं नाणं खणखणीत होतं. तिचा हा धंदा इतका पसरला की, शेवटी जेनाबाई अडनाव 'दारुवाला' असं झालं.
पोलिसांच्या तावडीत सापडली अन् पोलिसांचीच खबरी झाली
आता दारूचा धंदा करायचा तर, पोलिसांशी काॅन्टॅक्ट तर दांडगे असायला हवे. जेनाबाईने पोलिसांसोबत चांगले संबंध होते. परंतु, तिचा दारूचा वाढता पसारा पाहता १९६२ मध्ये तिच्या दारूच्या भट्टीवर छापा टाकत प्रत्यक्ष बेकायदेशीररित्या दारू विकताना जेनाबाईला पकडलं. त्यानंतर जगासमोर बनवाट दारू विक्री होत असल्याचा कारभार जगासमोर आला.
परंतु, असं सांगितलं जातं की, तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत जेनाबाईचे पोहोच होती. म्हणून पोलिसांची खबरी होण्याच्या अटीवर जेनाबाई तुरुंगमुक्त करण्यात आले. ती पोलिसांना तस्कारी करणाऱ्यांची माहिती देत असे आणि पोलिस त्या ठिकाणी जाऊन छापा टाकत असतं. त्यातील १० टक्के हिस्सा जेनाबाईला मिळत असे.