मुंबई : हार्बर मार्गावर रेल्‍वे वाहतूक विस्‍कळीत; चाकरमाण्यांचे हाल

 हार्बर मार्गावर रेल्‍वे वाहतूक विस्‍कळीत
हार्बर मार्गावर रेल्‍वे वाहतूक विस्‍कळीत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा जुईनगर ते नेरुळ स्थानकादरम्यान इलेक्ट्रिक बॉक्सला आग लागल्याने आज (बुधवार) सकाळी हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमाण्याचे हाल झाले.

आज बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जुईनगर – नेरूळ स्थानका दरम्यान रेल्वे मार्गावर इलेक्ट्रिक बॉक्सला आग लागल्याची घटना घडली. यामुळे सीएसएमटी ते पनवेल दरम्यानची सर्व वाहतूक ठप्प झाली. सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांचे यामुळे हाल झाले. हार्बर मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची एकच गर्दी झाली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news