मुंबई : विमानतळावरून थेट ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बंडखोर आमदार दाखल

मुंबई : विमानतळावरून थेट ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बंडखोर आमदार दाखल

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विधानसभा अध्यक्ष पदासाठी रविवारी निवडणुक होणार आहे. या मतदानासाठी शिवसेनेचे बंडखोर आमदार शनिवारी नऊ वाजता विमानतळावरन थेट ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.

४० ते ४२ आमदारांना विमानतळावरून ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आणण्यासाठी विशेष तीन बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. दोन बसमध्ये आमदार होते तर एक बस राखीव ठेवण्यात आली होती. या आमदारांच्या संरक्षणासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस, राज्य राखीव पोलीस तसेच गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी होते. रस्त्याच्या दुतर्फा तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सिग्नल यंत्रणा पूर्ण बंद करण्यात आली होती. पदपथावरून कोणालाही पोलीस सोडत नव्हते. याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांनी याबाबत काही माहिती दिली नाही.

बंडखोर मुंबईत आले तरी शिवसेनेकडून कोणताही विरोध झाला नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना मुंबई येऊ द्या, कोणी रस्त्यावर उतरू नका असा आवाहन केले होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news