मुंबई-पटना सुविधा स्पेशल ट्रेनचे भाडे विमानाएवढे!

मुंबई-पटना सुविधा स्पेशल ट्रेनचे भाडे विमानाएवढे!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  होळी आणि त्यानंतर सुरु होणार्‍या उन्हाळी सुट्टीत मुंबईतून उत्तर भारतात जाणार्‍या मेल-एक्सप्रेसला सर्वाधिक मागणी असते. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वेकडून सुविधा स्पेशल ट्रेन चालविण्यात येतात. परंतु या सुविधा स्पेशल ट्रेनचे तिकिट दर विमानाएवढेच असल्याने प्रवाशांनी या गाडीकडे पाठ फिरविली आहे.

संबंधित बातम्या

मुंबई ते पटनादरम्यान 15 मार्चला 82,356 सुविधा स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहेत. पटना एक्सप्रेसचे स्लीपर क्लासचे तिकिट 2 हजार 625 रुपये, थर्ड एस इकॉनॉमी क्लास 4 हजार 255 रुपये, थर्ड एसी साठी 5 हजार 560 रुपये तर सेकंड एसीकरिता 7 हजार 845 तिकिट दर आहे. त्याच दिवशीच्या विमानाचे तिकिट 8 हजार 544 रुपये आहे. रेल्वेतर्फे चालविण्यात येणार्‍या स्पेशल गाड्यांचे तिकिट दर मागणीनुसार चढे असतात. त्यामुळे या गाड्यांनी प्रवास करणार्‍या प्रवाशांना तिकिटासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात.

स्वस्त आणि किफायतशीर तिकिटामुळे देशातील सुमारे 80टक्यांपेक्षा जास्त प्रवासी लांब पल्याचा प्रवास मेल-एक्सप्रेसने करण्यास प्राधान्य देतात. परंतु होळी, उन्हाळी सुट्टी, गणेशोत्सव, दसरा-दिवाळीमध्ये रेल्वेतर्फे चालविण्यात येणार्‍या स्पेशल गाड्यांचे तिकिट दर जास्त असतात. या गाड्यांमध्ये कोणत्याही खास प्रवासी सुविधा पुरविण्यात येत नाहीत, तरीदेखील तिकिट दर जास्त असतो. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

पटना सुविधा एक्सप्रेसचे तिकिट दर जास्त असल्याने प्रवाशांनी या गाडीची तिकिटे आरक्षित केलेली नाहीत. स्लीपर क्लासमध्ये 51, थर्ड इकॉनॉमी क्लासमध्ये 192, थर्ड एसीमध्ये 100 आणि सेकंड एसीमध्ये 13 आसने उपलब्ध आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news