राज्यसभा निवडणूक : भाजपचे लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक मतदानासाठी ॲम्ब्युलन्सने रवाना

राज्यसभा निवडणूक : भाजपचे लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक मतदानासाठी ॲम्ब्युलन्सने रवाना
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; राज्यसभा निवडणुकीत काटे की टक्कर असल्याने प्रत्येक मतदान महत्वाचे ठरणार आहे. त्यासाठी आजारी असतानाही पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईकडे निघाल्या आहेत. भाजपने व्हीप जारी केल्यानंतर हा व्हीप पाळण्यासाठी त्यांनी प्रकृती बरी नसतानाही मतदानाला जाण्याचा निर्णय घेतला आहे.

लक्ष्मण जगताप यांना कॅन्सरने ग्रासले आहेत. त्यांना रुग्णायात दाखल करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत त्यांनी पक्षादेश पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील जगताप यांच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याने ते मतदानासाठी निघाले आहेत. मुक्ता टिळक या देखील काही दिवसांपासून आजारी आहेत. त्याही मतदान करण्यासाठी निघाल्या आहेत.

हे ही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news