Multi Asset Allocation Fund | ‘मल्टिअसेट अलोकेशन फंड’वरील कर आकारणी, जाणून घ्या याविषयी

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे लोकप्रिय साधन ठरत असले, तरी त्यावरची कर आकारणी जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. सर्व प्रकारच्या मल्टिअसेट लोकेशन फंडसने होणार्‍या कमाईवर एकसारखा कर नियम लागू होत नाही. ( Multi Asset Allocation Fund ) 

संबंधित बातम्या 

म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीतून होणार्‍या कमाईवर कोणत्या हिशेबाने कर भरावा लागतो, हा अगदी प्राथमिक प्रश्न आहे; पण हा प्रश्न साधारणपणे डेट आणि इक्विटी फंडाबाबत गुंतवणूकदारांना पडत असतात. इक्विटी फंडच्या श्रेणीत येणार्‍या म्युच्युअल फंडवर कर बचत होते, तर डेट फंडच्या बाबतीत कर आकारणीचा निकष वेगळा आहे. त्याचप्रमाणे मल्टिअसेट अलोकेशन फंडचे प्रकरण वेगळे आहे. कारण, मल्टिअसेट अलोकेशन फंडस्ने होणार्‍या कमाईवर किती कर आकारला जाईल ही बाब त्यातील फंडचे नाव ऐकूनच सांगता येईल. या श्रेणीतील वेगवेगळ्या फंडस्च्या कमाईवर वेगवेगळ्या हिशेबाने कर भरावा लागतो.

मल्टिअसेट अलोकेशनचा अर्थ

मल्टिअसेट अलोकेशन फंडस्वरील कर आकारणी ही अन्य फंडस्च्या तुलनेत वेगळी असते. यामागचे कारण म्हणजे या फंडस्ची वेगळी श्रेणी. मल्टिअसेट अलोकेशन फंडच्या श्रेणीत इक्विटी आणि डेटबरोबरच गोल्ड आणि रिअल इस्टेट सारख्या तिसर्‍या श्रेणीतील म्युच्युअल फंड येतात. एखाद्या म्युच्युअल फंडमधील मल्टिअसेट अलोकेशन फंड म्हणजे तीन श्रेणीतील संपत्ती (इक्विटी, डेट आणि गोल्ड किंवा रिअल इस्टेट) यामधील गुंतवणूक किमान दहा टक्के असणे. यात तीस टक्के गुंतवणूक अनिवार्य असते आणि उर्वरित फंडचे अलोकेशन फंड मॅनेजर आपल्या हिशेबाने करतो.

फंड अलोकेशनच्या हिशेबाने कर आकारणी

मल्टिअसेट अलोकेशन फंडची संकल्पना अगदी स्पष्ट आहे. या श्रेणीत वेगवेगळ्या फंडस्चे असेट अलोकेशनही वेगळे असते. या कारणांमुळे सर्वांवर कर आकारणी समान होत नाही. एखाद्या फंडचे इक्विटी अलोकेशन 65 टक्क्यांपेक्षा अधिक असेल, तर त्यावरची कर आकारणी ही इक्विटी फंडस्सारखीच होते. म्हणजे, अशा प्रकारचे फंड आपण तीन वर्षांपेक्षा अधिक काळ ठेवत असाल, तर त्यावर प्राप्तिकर कलम 80 सीनुसार कर सवलत मिळेल. त्याचबरोबर तीन वर्षांनंतर युनिटची विक्री केल्यास आणि एका आर्थिक वर्षाच्या काळात एक लाखापर्यंत फायदा होत असेल, तर त्यावर कोणताही कर भरावा लागत नाही. तीन वर्षांनंतर युनिट विक्री केल्यानंतर एका वर्षात एका लाखापेक्षा अधिक लाभ होत असेल, तर त्यावर दहा टक्के दराने लाँग टर्म कॅपिटल गेन्स भरावा लागेल. आपण युनिटला एक वर्ष ते तीन वर्षांपर्यंतच बाळगत असाल, तर त्यावर मिळणार्‍या फायद्यावर 15 टक्के दराने शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स भरावा लागेल. एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी म्युच्युअल फंड ठेवले, तर स्लॅबनुसार कर भरावा लागेल.

65 टक्क्यांपेक्षा कमी इक्विटी अलोकेशनवर कर आकारणी

एखाद्या मल्टिअसेट अलोकेशन फंडचे इक्विटी अलोकेशन 35 टक्क्यांपेक्षा अधिक असेल आणि 65 टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर त्यावर गुंतवणूक करणार्‍यांना 80 सी नुसार फायदा मिळणार नाही. अशा फंडस्ला आपण तीन वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत ठेवत असाल आणि नंतर विक्री करत असाल, तर त्यापासून मिळणार्‍या नफ्यावर वीस टक्के दराने कर भरावा लागेल. आपण अशा फंडसला तीन वर्षांच्या आतच विकत असाल आणि नफेखोरी करत असाल, तर त्यावर प्राप्तिकर स्लॅबच्या हिशेबाने कर भरावा लागेल. त्याचवेळी मल्टिअसेट अलोकेशन फंडस्चे इक्विटी अलोकेशन 35 टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर त्यांना त्याच्या विक्रीवर नेहमीच उत्पन्नाच्या स्लॅबच्या हिशोबाने कर भरावा लागेल.

मल्टिअसेट अलोकेशन फंडस् ऑफ फंडसचे अलोकेशन

मल्टिअसेट अलोकेशन फंड ऑफ फंडसमध्ये (FoFs) 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर केलेल्या गुंतवणुकीवर मिळणार्‍या लाभाला उत्पन्नाशी जोडले असून त्यानुसार स्लॅबप्रमाणे कर भरावा लागेल; मात्र फंड ऑफ फंडस्मधील गुंतवणूक 1 एप्रिल 2023 च्या अगोदर केली असेल आणि त्यास तीन वर्षांपर्यंत बाळगत नंतर विक्री केली जात असेल, तर त्यापासून मिळणार्‍या नफ्यावर इंडेसेक्शन बेनिफिट वगळून 20 टक्के दराने कर भरावा लागेल. तीन वर्षांच्या आत त्याची विक्री करून त्यापासून मिळणारा फायदा हा उत्पन्नाशी जोडला जाईल व स्लॅबनुसार प्राप्तिकर आकारला जाईल. ( Multi Asset Allocation Fund )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news