जेरुसलेम ; पुढारी ऑनलाईन हमास संघटनेने इस्रायलवर Israel-Palestine War शनिवारी सात हजार क्षेपणास्त्रे डागल्यानंतर मध्य पूर्वेत युद्ध पेटले आहे. या रक्तरंजित संघर्षात 40 जवानांसह 100 इस्रायली नागरिक मारले गेले. इस्रायलने या हल्ल्याला युद्ध घोषित करीत गाझा पट्टीचा भाग हवाई दलाची विमाने आणि क्षेपणास्त्रांच्या मार्याने अक्षरशः भाजून काढला. दरम्यान हमासने केलेल्या हल्ल्यात पुन्हा एकदा ३०० हून अधिक लोक ठार झाले आहेत.
Israel-Palestine War दरम्यान या युद्धात 198 पॅलेस्टिनी मरण पावले. या दोन्ही घटनांत दोन हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. क्षेपणास्त्र मार्यासोबतच गाझा पट्टीचे कुंपण तोडत हमासच्या शेकडो दहशतवाद्यांनी इस्रायली शहरांत प्रवेश करीत 54 जवान व नागरिकांना ताब्यात घेत गाझा पट्टीत नेले आहे.