आमदार गीता जैन यांनी लगावली कंत्राटी अभियंत्याच्या कानशिलात (व्हिडिओ)

आमदार गीता जैन यांनी लगावली कंत्राटी अभियंत्याच्या कानशिलात (व्हिडिओ)

भाईंदर: पुढारी वृत्तसेवा : मीरा भाईंदरच्या आंमदार गीता जैन यांनी मीरा भाईंदर महापालिकेतील कंत्राटी अभियंत्याच्या कानशिलात लगावली. शुभम पाटील असे या अभियंत्याचे नाव आहे. पावसाळ्यात कोणत्याही बांधकामावर कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश असताना पाटील हे आणखी एका सहकाऱ्यासह पेणकर पाडा येथील एका खासगी जागेतील बांधकाम हटविण्यासाठी गेले होते. यावेळी आ.जैन या कारवाईच्या ठिकाणी गेल्या.

त्यावेळी त्यांनी त्या अभियंत्यांना शासकीय आदेशाचे पालन करण्याबाबत सूचना करीत असताना शुभम पाटील हे हसू लागल्याने जैन यांना राग अनावर झाला. त्यांनी त्याच्या कानशिलात लगावत त्याला अपशब्द वापरले. या घटनेचा व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असता त्यावर अनेक नेटकऱ्यांनी उलटसुलट प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news